शहरं
Join us  
Trending Stories
1
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
2
"ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
3
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
4
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
5
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
6
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
7
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
8
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
9
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
10
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
11
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
12
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
13
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
14
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
15
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
16
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
17
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
18
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
19
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
20
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू

केळी उत्पादकांना हेक्टरी १८ हजारांचा मोबदला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2018 4:43 AM

अतिवृष्टीमुळे जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून त्यांना प्रति हेक्टरी १८ हजार रुपयाची नुकसान भरपाई देण्याची घोषणा मदत व पुनर्वसन राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी गुरुवारी विधानसभेत केली.

नागपूर : अतिवृष्टीमुळे जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून त्यांना प्रति हेक्टरी १८ हजार रुपयाची नुकसान भरपाई देण्याची घोषणा मदत व पुनर्वसन राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी गुरुवारी विधानसभेत केली. परंतु सदस्यांचे यावरही समाधान झाले नाही, तेव्हा ही मदत वाढवण्याचाही विचार शासन करेल, असेही त्यांनी जाहीर केले.राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश टोपे यांनी जळगाव जिल्ह्यात चक्रीवादळाने केळी उत्पादक शेतकºयांच्या नुकसानीसंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावर उत्तर देताना राज्यमंत्री कांबळे यांनी सांगितले की, जळगाव जिल्ह्यात १, ५ व ६ जून रोजी वादळी वारा व पावसामुळे जिल्ह्यातील रावेर, मुक्ताईनगर, यावल व चोपडा या तालुक्यातील केळी पिकांचे एकूण ४४१३.१४ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले आहे. या नुकसानीमुळे बाधित शेतकºयांच्या मदत देण्याच्या दृष्टीन्ीे संयुक्त पंचनामे करण्यात आले आहेत. केळी उत्पादक शेतकºयांना मदत देण्यासाठी शासन सकारात्मक आहे. यावेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, हरिभाऊ जावळे यांनी सहभाग घेतला.> मध्य प्रदेशात एक लाखाची मदतभाजपचे ज्येष्ठ सदस्य एकनाथ खडसे यांनी यावेळी केळी उत्पादक शेतकºयांची व्यथा मांडली. ते म्हणाले या वादळी पावसामुळे जो भाग प्रभावित झाला तो मध्य प्रदेश राज्याच्या सीमेला लागून आहे. त्यातील काही शेती मध्य प्रदेशातही आहे. त्यांच्या राज्यातील केळी उत्पादकांचेही मोठे नुकसान झाले. तेथील सरकारने प्रभावित भागाचा दौरा करून मदतीचे पॅकेज जाहीर केले. त्यात प्रत्येकी १ लाख रुपयाची मदत जाहीर करण्यात आली. यासोबत विजेचे बिल माफ करीत खाली पडलेली केळी सरकारतर्फे हटविण्याची घोषणाही करण्यात आली. त्या तुलनेत महाराष्ट्र सरकारची मदत म्हणजे शेतकºयांची ‘टिंगलटवाळी’ होय. तेव्हा मध्य प्रदेश सरकारप्रमाणे मदत करणार का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.>आजवर कधीचमागितली नाही मदतराष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सुद्धा शासकीय मदत अपूर्ण असल्याचे सांगत राज्यातील केळी उत्पादकांनी आजवर कधीच शासनाकडे मदत मागितली नाही. चिकू, आंबा, काजू उत्पादकही मदत मागत नाही. सरकार नेहमीच धान, कापूस, सोयाबीनला मदत देत असते. तेव्हा हा कोकण आणि उत्तर महाराष्ट्रावर अन्याय आहे.

टॅग्स :nagpurनागपूरNagpur Monsoon Session 2018नागपूर पावसाळी अधिवेशन २०१८