शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

'दुधाच्या प्लॅस्टिक पिशव्यांवरील बंदी एका महिन्यात लागू होणार'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2019 12:49 IST

पर्यावरण मंत्री रामदास कदम यांची विधानसभेत माहिती

मुंबई: दुधाच्या प्लॅस्टिक पिशव्यांवरील बंदी एका महिन्यात लागू होईल, अशी  माहिती पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी आज विधानसभेत दिली. दुधाची पिशवी घेताना ५० पैसे डिपॉझिट घ्यायचे आणि पिशवी परत दिली की ५० पैसे परत द्यायचे ही योजना सर्व दुध कंपन्यांनी मान्य केली आहे. एका महिन्यात हे सुरू होईल अशी माहिती कदम यांनी विधानसभेत दिली. राज्यात दिवसाला १ कोटी दुधाच्या प्लॅस्टिक पिशव्या रस्त्यावर येतात आणि त्यातून ३१ टन प्लॅस्टिक कचरा निर्माण होत असल्याचे कदम यांनी सांगितले.राज्यात प्लॅस्टीक बंदी लागू झाली, मात्र दुधाच्या प्लॅस्टीक पिशव्यांचा वापर अद्याप सुरू असल्याकडे विधानसभेत काही आमदारांनी पर्यावरण मंत्र्यांचे लक्ष वेधले. विधानसभेत आज  प्लॅस्टिक बंदीबाबतची लक्षवेधी उपस्थित करण्यात आली होती. त्यावर कदम यांनी भाष्य केलं. राज्यात १२०० टन प्लॅस्टिक कचरा राज्यात निर्माण होत होता. प्लॅस्टिक बंदीनंतर यातील ६०० टन प्लॅस्टिक कचरा कमी झाला. राज्यात येणारं प्लॅस्टिक हे बाहेरील राज्यातून येतं. यात गुजरातमधून ८० टक्के प्लॅस्टिक येतं. ते बंद करण्यासाठी गुजरात सीमेवर प्लॅस्टिक ट्रकवर आपण स्वतः जाऊन कारवाई केल्याची माहिती कदम यांनी दिली.राज्यात १ लाख २० हजार २८६ टन प्लॅस्टिक जप्त केलं करण्यात आले असून २४ कंपन्या दिवसाला ५५० टन प्लॅस्टिकवर प्रक्रिया करतात. तर सिमेंट कंपन्यांना ३००० हजार टन प्लॅस्टिक वापरायला दिले असल्याचे कदम यांनी सांगितले. या लक्षवेधीवर बोलताना शिवसेना आमदार सुनील प्रभू यांनी राज्यात अजूनही प्लॅस्टिकचा सर्रास वापर केला जात असल्याचा दावा केला. तर दुधाच्या पिशव्या ही शहराच्या दृष्टीने एक मोठी समस्या असून सरकार त्याबाबत काय निर्णय घेणार आहे, असा प्रश्न उपस्थित केला होता. तर विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार परराज्यातून येणारे प्रवासी मोठ्या प्रमाणावर प्लॅस्टिक घेऊन येतात. रेल्वेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक राज्यात येत असल्याचे पर्यावरण मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. 

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीmilkदूधRamdas Kadamरामदास कदम