शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

Badnera Assembly Election 2024 Result Live Updates: "आमच्या रामाचं बाण मतदारांनी चालवून दाखवलं, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार"

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2024 13:33 IST

Badnera Assembly Election 2024 Result Live Updates: रवी राणा हे सध्या आघाडीवर आहेत. याच दरम्यान नवनीत राणा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Badnera Assembly-Vidhan Sabha Election 2024 Result Live : गेल्या १५ वर्षांपासून बडनेऱ्याची जागा जिंकून आमदारकीची हॅटट्रिक साधणारे अपक्ष आमदार रवी राणा हे चौथ्यांदा विजयाचा चौकार लगावण्यासाठी सर्वशक्तीनिशी रणमैदानात उतरले आहेत. सोबतच, शिवसेना ठाकरे गटाची उमेदवारी सुनील खराटे यांना गेल्याने सन २०१९ मध्ये ४० टक्के मते घेऊन दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या प्रीती बंड या अपक्ष म्हणून रिंगणात आहेत, तर भाजपच्या तिकिटासाठी आग्रही असलेले तुषार भारतीय यांनी अपक्ष म्हणून नामांकन कायम ठेवत बडनेऱ्याची लढत तिरंगी केली. 

रवी राणा हे सध्या आघाडीवर आहेत. याच दरम्यान नवनीत राणा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "आमच्या रामाचं बाण या जिल्ह्यात माझ्या मतदारांनी चालवून दाखवलं. ज्यांनी माझ्या विरोधात काम केलं, त्याचा बदला माझ्या जिल्ह्यातील लोकांनी घेतला आहे" असं म्हटलं आहे. तसेच मुख्यमंत्री हे भाजपाचेदेवेंद्र फडणवीस होणार यात काही शंका नाही. राहुल गांधींचा खोटारडेपणा हा लोकसभेत चालला पण विधानसभेत चालला नाही असं म्हणत जोरदार निशाणा साधला आहे. 

"अल्प मतांनी जेव्हा माझा पराभव झाला. तेव्हा माझ्या जिल्ह्यातील असे बरेच कुटुंब होते, ज्यांनी दोन दोन दिवस जेवण केलं नव्हतं. आमच्या रामाचं बाण या जिल्ह्यात माझ्या मतदारांनी चालवून दाखवलं. ज्यांनी माझ्या विरोधात काम केलं, त्याचा बदला माझ्या जिल्ह्यातील लोकांनी घेतला आहे. लाडकी बहीण, लोकसभेचा राग हे सगळं आता दिसत आहे. सहा महिन्यापासून लोकं हे मतदान कधी येईल याची वाट पाहत होते."

"मुख्यमंत्री हे भारतीय जनता पक्षाचे आमचे देवेंद्र फडणवीस होणार यात काही शंका नाही. राहुल गांधींचा खोटारडेपणा हा लोकसभेत चालला पण विधानसभेत चालला नाही. तोच खोटारडेपणा आम्ही उचलून बाहेर फेकला आणि यामध्ये लोकांनी आमची साथ दिली आहे" असं नवनीत राणा यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे. भाजप, शिंदेसेना व राष्ट्रवादी अजित पवार गट हे प्रमुख पक्ष असलेल्या महायुतीने बडनेयाची जागा युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार रवि राणा यांच्यासाठी सोडली आहे. त्यामुळे ते महायुतीचे संयुक्त उमेदवार ठरले आहेत. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४navneet kaur ranaनवनीत कौर राणाRavi Ranaरवी राणाBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस