शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
9
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
10
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
11
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
12
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
13
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
14
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
15
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
16
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
17
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
18
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
19
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
20
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
Daily Top 2Weekly Top 5

बदलापूरच्या टीडीआर घोटाळ्याचा परिणाम अंबरनाथच्या विकासावर

By admin | Updated: August 22, 2015 00:47 IST

बदलापूरच्या वहुचर्चेत टीडीआर घोटाळा प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केल्याने या प्रकरणात अंबरनाथचे दोन प्रमुख अधिकारी अडकले आहे

बदलापूर : बदलापूरच्या वहुचर्चेत टीडीआर घोटाळा प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केल्याने या प्रकरणात अंबरनाथचे दोन प्रमुख अधिकारी अडकले आहे. त्यात मुख्याधिकारी आणि सहाय्यक नगररचनाकार गुंतल्याने हे दोन्ही अधिकारी पालिका कार्यालयातुन गायब झाले आहे. त्यामुळे अंबरनाथ शहरातील विकास कामांवर परिणाम होणार आहे.कुळगांव-बदलापूर नगरपरिषदेत २०१० ते २०१३ या तीन वर्षांच्या कार्यकाळात मोठी अफरातफर करण्यात आली. टीडीआर (सार्वजनिक सुविधा विकास हस्तांतर)अंतर्गत अनेक बोगस कंपन्यांना कामे देऊन हा घोटाळा करण्यात आला. विकास नियमावलीला बगल देऊन हे काम करण्यात आले होते. ज्या कार्यकाळात हा घोटाळा झाला त्या काळात बदलापूरच्या मुख्याधिकारीपदी भालचंद्र गोसावी आणि सहाय्यक नगररचनाकार पदावर सुनिल दुसाने हे कार्यरत होते. या घोटाळ्यानंतर गोसावी यांची बदली अंबरनाथ नगरपरिषदेत करण्यात आली. तर योगायोगाने सहाय्यक नगररचनाकर दुसाने यांनाही अंबरनाथचा पदभार देण्यात आला. १९ आॅगस्ट रोजी यांच्यावर गुन्हा दाखल झाला त्यावेळी हे दोन्ही अधिकारी अंबरनाथमध्ये कार्यरत होते. शहराच्या विकासाचे धोरण ठरविण्याची मोठी जबाबदारी ही मुख्याधिकारी आणि सहाय्यक नगररचनाकार यांच्याकडेच असते. मात्र अंबरनाथमध्ये कार्यरत असलेले हे दोन्ही अधिकारी बदलापूरच्या टीडीआर घोटाळ्यात अडकल्याने हे दोन्ही अधिकारी गेल्या काही दिवसांपासुन अंबरनाथ पालिकेत येत नाहीत. त्यामुळे शहरातील विकास कामांवर निर्णय घेण्यास विलंब होत आहे. अंबरनाथप्रमाणे बदलापूर शहराचीही तीच अवस्था झाली आहे. प्रमुख अधिकारी या घोटाळ्यात अटकल्याने हे सर्वजन पालिका कार्यालयातुन गायब झाले आहेत. त्यामुळे बदलापूर शहरातील विकास कामेही खुंटली आहेत. तर उरलेल्या अधिका-यांना संबंधीत प्रकरणातील कागदपत्रे तयार करण्याची कामे देण्यात आली आहेत. (प्रतिनिधी)