शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
3
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
4
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
5
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
6
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
7
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
8
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
9
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
10
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
11
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
12
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
13
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
14
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
15
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
16
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
17
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
18
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
19
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
20
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
Daily Top 2Weekly Top 5

न्यायाधीशांची पाठदुखी रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नव्हे!

By admin | Updated: October 22, 2016 04:31 IST

उच्च न्यायालयातील न्यायाधीशांना पाठदुखीचा त्रास मुंबईतील खड्ड्यांमुळे नव्हे, तर त्यांच्या जुन्या वाहनांमुळे होत असेल, असा अजब युक्तिवाद मुंबई महापालिकेने शुक्रवारी केला.

मुंबई : उच्च न्यायालयातील न्यायाधीशांना पाठदुखीचा त्रास मुंबईतील खड्ड्यांमुळे नव्हे, तर त्यांच्या जुन्या वाहनांमुळे होत असेल, असा अजब युक्तिवाद मुंबई महापालिकेने शुक्रवारी केला.मुंबईत गाडीतून प्रवास करताना खड्ड्यांमुळे पाठदुखीचा त्रास होतो, असे उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ न्यायाधीश व्ही. एम. कानडे यांनी एका सुनावणीत म्हटले होते. शुक्रवारी उच्च न्यायालयात मुंबईतील खड्ड्यांप्रकरणी झालेल्या सुनावणीत हाच धागा पकडत महापालिकेच्यावतीने ज्येष्ठ वकील अनिल साखरे यांनी युक्तिवाद करताना, न्यायाधीशांच्या गाड्यांचे सस्पेन्शन खराब आहे. त्यामुळे त्यांना जास्त धक्के बसतात आणि त्यानेच त्यांना पाठदुखीचा त्रास होतो. सरकारने त्यांना नव्या गाड्या घेऊन द्याव्यात, असासल्ला दिला. मुंबईतील खड्ड्यांची दखल घेत उच्च न्यायालयाने ‘स्यु-मोटो’ याचिका दाखल करून घेतली आहे. न्या. शंतनू केमकर व न्या. एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठापुढे या याचिकेवरील सुनावणी होती. या याचिकेतील एका मध्यस्थीने यावर लवकर सुनावणी घेण्यात यावी, अशी विनंती खंडपीठाला केली. खड्डे बुजवल्याचा दावा पालिका करत असली तरी स्थिती फारशी बदलेली नसल्याचे असे सांगितले. (प्रतिनिधी)खड्डे बुजवणे सुरू...यंदा पाऊस ९९ दिवस पडल्याने, अशी स्थिती उद्भवली आहे. आता पाऊस गेला आहे. खड्डे बुजवण्यासाठी आमचे अभियंते रात्रंदिवस काम करत आहेत, असे अ‍ॅड. साखरे यांनी म्हटले. उच्च न्यायालयाने या याचिकेवरील पुढील सुनावणी २४ आॅक्टोबर रोजी ठेवत मध्यस्थीच्या वकिलाला सर्व तपशीलवार माहिती सादर करण्याचे निर्देश दिले.