शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांचे उपोषण मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2015 02:06 IST

पुण्यातील प्रतिष्ठित ‘फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडिया’(एफटीआयआय)च्या अध्यक्षपदी अभिनेते गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीवरून निर्माण झालेल्या वादावर येत्या

पुणे : पुण्यातील प्रतिष्ठित ‘फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडिया’(एफटीआयआय)च्या अध्यक्षपदी अभिनेते गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीवरून निर्माण झालेल्या वादावर येत्या मंगळवारी (२९ सप्टेंबर) तोडगा निघण्याची आशा निर्माण झाली असून, सरकारचे चर्चेचे निमंत्रण मान्य करीत संस्थेच्या विद्यार्थ्यांनी गत १८ दिवसांपासून आरंभलेले आमरण उपोषण मागे घेतले आहे.चौहान यांना हटविण्याच्या मागणीसाठी एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांनी गत तीन महिन्यांपेक्षा अधिक काळापासून चालवलेले आंदोलन तीव्र करीत गत १८ दिवसांपासून आमरण उपोषण आरंभले होते. मात्र रविवारी अखेर विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी माहिती व प्रसारण मंत्रालयाने चर्चेचे आमंत्रण दिले आणि या आमंत्रणाचा स्वीकार करीत विद्यार्थ्यांनाही आपले उपोषण मागे घेण्याची घोषणा केली. एफटीआयआय विद्यार्थी संघाचे प्रतिनिधी रंजित नायर यांनी याबाबतची घोषणा केली. सरकारसोबतची चर्चा सकारात्मक वातावरणात व्हावी, यासाठी आम्ही उपोषण मागे घेतले आहे. मंगळवारी मुंबईच्या फिल्म्स डिव्हिजनमध्ये सरकारने आम्हाला चर्चेसाठी बोलावले आहे, असे नायर म्हणाले.केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाने चर्चेसाठी बैठक व तारीख निश्चित केल्यास उपोषण मागे घेण्याची तयारी शनिवारी विद्यार्थ्यांनी दर्शविली होती. यानंतर सरकारनेही तातडीने आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांसोबत चर्चेची तयारी दर्शवीत तसा प्रस्ताव दिला. चौहान यांच्या नियुक्तीविरोधात एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांनी प्रखर आंदोलन उभारले होते. अभिनेते अनुपम खेर, रणबीर कपूर, सलमान खान यांच्यासह बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांनी या आंदोलनात उडी घेतली होती. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीही या विद्यार्थ्यांना पाठिंबा जाहीर केला होता. (प्रतिनिधी)