शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
5
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
6
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
7
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
8
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
9
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
10
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
11
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
12
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
13
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
14
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
15
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
16
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
17
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
18
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
19
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
Daily Top 2Weekly Top 5

सतर्कतेमुळे टळला अतिप्रसंग

By admin | Updated: December 15, 2014 04:06 IST

एका १०वर्षीय चिमुरडीच्या प्रसंगावधानतेमुळे तिच्यावर ओढावणारा अतिप्रसंग टळल्याची धक्कादायक घटना भांडुपमध्ये घडली

मुंबई : एका १०वर्षीय चिमुरडीच्या प्रसंगावधानतेमुळे तिच्यावर ओढावणारा अतिप्रसंग टळल्याची धक्कादायक घटना भांडुपमध्ये घडली. या प्रकरणी ४७ वर्षीय अनिल किल्ले या नराधम शिक्षकास भांडुप पोलिसांनी विनयभंगाच्या गुन्ह्यात अटक केली आहे. शिक्षकपेशाला खालच्या स्तरावर नेऊन ठेवणाऱ्या या शिक्षकाच्या या कृत्याची आज दिवसभर परिसरात चर्चा घडत होती. भांडुप पश्चिमेकडील जंगलमंगल रोड येथील एका उच्चभ्रू इमारतीच्या अकराव्या मजल्यावर चिनू (नाव बदलले आहे) आई वडिलांसह राहण्यास आहे. त्याच इमारतीच्या आठव्या मजल्यावर किल्ले राहण्यास आहे. आज सायंकाळी साडेसातच्या सुमारास चिनू आठव्या मजल्यावरील लहान मुलांसोबत नेहमीप्रमाणे खेळण्यास आली होती. त्याचदरम्यान किल्लेच्या घरात एक लहान मुल झोपलेले दिसले, म्हणून ती त्याला पाहात राहिली. दरम्यान नराधम किल्लेची नजर चिनूवर पडली आणि त्याने चिनूला टीव्ही बघायला ये असे सांगितले. चिनूने घरात प्रवेश करताच या नराधमाने घराची आतून कडी लावून चिनूसोबत अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. मात्र चिनूने वेळीच प्रसंगावधान साधून ओरड घालण्यास सुरुवात केली. अशात चिनूच्या आरडाओरडाने शेजारचे जागे होतील, या भीतीने तत्काळ किल्लेने दरवाजा उघडला. तोच चिनूने हंबरडा फोडत आईकडे धाव घेतली. चिनूने झालेला प्रकार सांगताच तिच्याही पायाखालची जमीन सरकली. आईने तत्काळ पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधत गुन्ह्याची माहिती दिली. भांडुप पोलिसांना याची माहिती मिळताच पोलिसांनी चिनूच्या घराकडे धाव घेत आरोपीच्या मुसक्या आवळल्या. (प्रतिनिधी)