ऑटोला मालवाहूची धडक; तीन ठार, दोन गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2017 02:34 IST2017-03-23T02:34:23+5:302017-03-23T02:34:23+5:30

नांदुरा येथून प्रवासी घेऊन चांदुरबिस्वा येथे जाणार्‍या ऑटोला मालवाहू वाहनाने जोरदार धडक दिली.

Autola hit the cargo; Three killed, two serious | ऑटोला मालवाहूची धडक; तीन ठार, दोन गंभीर

ऑटोला मालवाहूची धडक; तीन ठार, दोन गंभीर

नांदुरा (जि. बुलडाणा), दि. २२-नांदुरा येथून प्रवासी घेऊन चांदुरबिस्वा येथे जाणार्‍या ऑटोला मालवाहू वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात तीन जण ठार झाले तर दोन जण गंभीर जखमी झाले. ही घटना २२ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता येथील पॉवर हाऊसजवळ घडली.
चांदुरबिस्वा येथील ऑटोचालक मो.जावेद (३४) हा नांदुरा येथून चांदुरबिस्वाकडे प्रवासी घेवून जात होता. मोठय़ा हनुमानापासून काही अंतरावर पावर हाऊसजवळ या ऑटोला जळगाव खान्देश येथून वर्धा येथे कांद्याचे कट्टे घेऊन जाणार्‍या मालवाहू (एमएच-३२क्यु५२२३) ने जोरदार धडक दिली. या अपघातात ऑटोतील प्रवासी मो.तौसीफ मो.आसीफ (वय १८), मो.हनीफ मो.गुलाम नबी (वय ७५) रा.चांदुरबिस्वा व प्रभाकर काशीराम पांडव (वय ६0) रा.टाकळी वतपाळ हे तीन प्रवासी घटनास्थळीच ठार झाले. तर ऑटोचालक मो.जावेद हा जखमी झाल्याने त्याचावर नांदुरा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू असून अन्य जखमीला खामगाव येथे हलविण्यात आले. अपघातानंतर मालवाहू वाहनचालक वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला. मात्र पोलिसांनी तात्काळ नाके बंदी करुन मालवाहू वाहनाचा चालक संजय प्रभाकर वाहे (३९) व क्लिनर दिनकर वामनराव अडगावकर या दोघांना ताब्यात घेतले. याप्रकरणी रात्री उशीरापर्यंंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Web Title: Autola hit the cargo; Three killed, two serious