MNS: राज ठाकरेंबद्दल आक्षेपार्ह पोस्ट, संतप्त मनसे कार्यकर्त्यांनी रिक्षाचालकाला गाठलं आणि रस्त्यावरच...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 11:55 IST2025-11-25T11:52:37+5:302025-11-25T11:55:32+5:30
Raj Thackeray: मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणे ठाण्यातील एका रिक्षाचालकाला चांगलेच महागात पडले.

MNS: राज ठाकरेंबद्दल आक्षेपार्ह पोस्ट, संतप्त मनसे कार्यकर्त्यांनी रिक्षाचालकाला गाठलं आणि रस्त्यावरच...
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणे ठाण्यातील एका रिक्षाचालकाला चांगलेच महागात पडले आहे. मनसेच्या संतप्त कार्यकर्त्यांनी या रिक्षाचालकाला गाठून त्याला रस्त्यावरच उठाबशा करायला लावल्या आणि जाहीरपणे माफी मागण्यास भाग पाडले.
मिळालेल्या माहितीनुसार, शैलेंद्र यादव (वय, ३५) असे या रिक्षाचालकाचे नाव आहे. शैलेंद्र यादवने राज ठाकरे यांच्यासह इतर राजकीय पक्षांच्या नेत्यांबद्दल अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्ये करणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला होता. हा व्हिडीओ व्हायरल होताच मनसेचे कार्यकर्ते संतप्त झाले. त्यांनी तातडीने संबंधित रिक्षाचालकाला शोधून गाठले आणि त्याला रस्त्यावर सर्वांसमक्ष उठाबशा करायला लावत जाहीर माफी मागण्यास भाग पाडले. या घटनेचा व्हिडिओही आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मनसे उपविभागीय प्रमुखांनी केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी याप्रकरणी तातडीने कारवाई केली आहे. चितळसर पोलिस ठाण्यात आरोपी रिक्षाचालक शैलेंद्र यादव याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. तसेच, या प्रकरणातील आणखी एक आरोपी फरार आहे, त्याचे नाव राकेश यादव (वय, २७) असून तो ठाण्यातील कशेळी परिसरातील रहिवासी आहे. पोलीस राकेश यादवचा शोध घेत आहेत.