‘एमएमआर’च्या धर्तीवर कोकणासाठी प्राधिकरण; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2023 06:55 AM2023-03-04T06:55:30+5:302023-03-04T06:55:45+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोकणच्या  चौफेर विकासासाठी मुंबई महानगर प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) धर्तीवर कोकणसाठी प्राधिकरणाची स्थापना केली जाईल. राज्यात ...

Authority for Konkan on lines of 'MMR'; Announcement of the Chief Minister in the Legislative Assembly | ‘एमएमआर’च्या धर्तीवर कोकणासाठी प्राधिकरण; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा

‘एमएमआर’च्या धर्तीवर कोकणासाठी प्राधिकरण; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा

googlenewsNext

लाेकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोकणच्या  चौफेर विकासासाठी मुंबई महानगर प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) धर्तीवर कोकणसाठी प्राधिकरणाची स्थापना केली जाईल. राज्यात सुरू असलेले कोट्यवधी रुपये खर्चाचे पायाभूत सुविधा प्रकल्प येत्या दोन वर्षांत पूर्ण केले जातील, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी विधानसभेत केली. 

राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी आघाडी सरकारच्या काळात सिंचनावर ७० हजार कोटी खर्च झाले होते. मात्र, केवळ ०.१ टक्काच शेती सिंचनाखाली आली होती, असा  चिमटा काढला. आम्ही मात्र ३८ हजार कोटी खर्च करून ५ लाख २१ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली आणणार म्हणजे आणणारच, असा निर्धारही मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.

स्थगिती योग्य वेळी उठविणार
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे सरकारने तत्कालीन ठाकरे सरकारच्या कामांना स्थगिती दिली. मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी विरोधी बाकांवरून स्थगिती उठविण्याची मागणी होत होती. त्यावेळी आपल्या सरकारने स्थगिती का दिली, हे स्पष्ट करतानाच एकनाथ शिंदे यांनी विकास कामावरील स्थगिती योग्य वेळी उठविली जाईल, असे आश्वासन दिले. यावेळी शिंदे यांनी गेल्या आठ महिन्यांतील सरकारच्या निर्णयांचा पुनरुच्चार केला.

 ३३७ किमी मेट्रोचे जाळे 
मुंबईत पूर्ण करणार
 मुंबईत ४५० किमीच्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण सुरू. येत्या दोन वर्षांत मुंबई खड्डेमुक्त करू.

Web Title: Authority for Konkan on lines of 'MMR'; Announcement of the Chief Minister in the Legislative Assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.