शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

दिवा रेल्वे स्थानकाजवळ घातपाताचा प्रयत्न?

By admin | Updated: January 26, 2017 05:03 IST

मुंबई उपनगरी रेल्वे मार्गावरील दिवा स्टेशन ते पारसिक बोगद्यादरम्यान एक मोठा अपघात मंगळवारी रात्री टळला. रुळावर सात मीटर लांबीचा आणि जवळपास ४00 किलो वजनाचा रुळाचा एक तुकडा टाकण्यात आला होता.

मुंबई : मुंबई उपनगरी रेल्वे मार्गावरील दिवा स्टेशन ते पारसिक बोगद्यादरम्यान एक मोठा अपघात मंगळवारी रात्री टळला. रुळावर सात मीटर लांबीचा आणि जवळपास ४00 किलो वजनाचा रुळाचा एक तुकडा टाकण्यात आला होता. मात्र, मुंबईच्या दिशेने येणाऱ्या जनशताब्दी एक्स्प्रेसच्या चालकाच्या निदर्शनास वेळीच ही बाब आल्याने पुढील अनर्थ टळला.मंगळवारी रात्री १0.४0च्या सुमारास दादरच्या दिशेने येणारी मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस दिवा स्टेशनवरून पारसिक बोगद्याच्या दिशेने जात असताना, रेल्वेमार्गावर सात मीटर लांबीचा रुळाचा तुकडा पडलेला असल्याचे चालक हरेंद्र कुमार यांना दिसला. त्यांनी त्वरित गाडी थांबवून याची माहिती रेल्वे पोलिसांना दिली. त्यानंतर, रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ), लोको पायलट (चालक), गार्ड यांनी प्रवाशांच्या सहाय्याने हा तुकडा उचलून बाजूला केला आणि ट्रेन रात्री पावणेअकराच्या सुमारास पुढे रवाना झाली. याची गंभीर दखल रेल्वे प्रशासनाने घेतली असून यामागे घातपात घडवण्याचा उद्देश होता का, यादृष्टीने आरपीएफ आणि लोहमार्ग पोलिसांनी तपास सुरू केला आहे. महत्वाची बाब म्हणजे, घटनास्थळी चार ते पाच अज्ञात इसमांनाचा वावर होता, अशी माहितीही रेल्वे पोलिसांच्या हाती लागली आहे.१७ मिनिटांतच घडामोडीरात्री १0.४0 च्या सुमारास दादरच्या दिशने जाणाऱ्या जनशताब्दी एक्स्प्रेसच्या लोको पायलटला ही घटना दिसून आली. तत्पूर्वी येथूनच रात्री १0.२३ च्या सुमारास कर्जत लोकल रवाना झाली होती. त्यामुळे या दोन्ही ट्रेनच्या १७ मिनिटांच्या वेळेतेच काहीतरी घडल्याची शक्यता आरपीएफकडून वर्तविली जात आहे.