स्टंटबाजी करून पाप झाकण्याचा प्रयत्न - अशोक चव्हाण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2021 09:56 IST2021-07-07T09:56:21+5:302021-07-07T09:56:30+5:30

विधिमंडळात भाजपने केलेल्या आंदोलनाबाबत प्रतिक्रिया देताना चव्हाण म्हणाले की, लोकशाहीच्या नावाने भाजप कितीही गळे काढत असले तरी त्यात काहीही अर्थ नाही.

Attempt to cover sin by stunting Say Ashok Chavan | स्टंटबाजी करून पाप झाकण्याचा प्रयत्न - अशोक चव्हाण 

स्टंटबाजी करून पाप झाकण्याचा प्रयत्न - अशोक चव्हाण 

मुंबई : विधानसभा तालिका अध्यक्षांशी केलेले गैरवर्तनाचे पाप झाकण्यासाठी भाजप स्टंटबाजी करत असल्याची टीका सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे.

विधिमंडळात भाजपने केलेल्या आंदोलनाबाबत प्रतिक्रिया देताना चव्हाण म्हणाले की, लोकशाहीच्या नावाने भाजप कितीही गळे काढत असले तरी त्यात काहीही अर्थ नाही. भाजपच्या आमदारांनी आपल्याबाबत अशोभनीय शब्द वापरले, गैरवर्तणूक केली, हे स्वतः विधानसभा तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी काल सभागृहात प्रत्यक्ष सांगितले. त्यावेळी विरोधी पक्षनेतेही सभागृहात उपस्थित होते. परंतु, तेव्हा त्यांनी तालिका अध्यक्षांच्या विधानाच्या सत्यतेबाबत कोणताही आक्षेप नोंदवला नाही. याचाच अर्थ भास्कर जाधव बोलले ते खरे होते, असे ध्वनित होते, असे ते म्हणाले.

...त्यासाठी नैतिकता असावी लागते
हा सारा बनाव महाराष्ट्रातील जनतेच्या लक्षात येणार नाही, असे भारतीय जनता पक्षाला वाटत असेल, तर तो त्यांचा गैरसमज आहे. केलेली चूक मान्य करणे, हेच खरे प्रायश्चित आहे. पण त्यासाठी नैतिकता असावी लागते, इच्छाशक्ती असावी लागते. लोकशाहीच्या नावाखाली स्टंटबाजी करून ते आपले पाप झाकण्याचा प्रयत्न करत आहेत, असे चव्हाण म्हणाले. 
 

Web Title: Attempt to cover sin by stunting Say Ashok Chavan