शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
5
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
6
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
7
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
8
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
9
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
10
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
11
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
12
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
13
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
14
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
15
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
16
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
17
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
18
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
19
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
20
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

पाणीप्रश्नी हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा

By admin | Updated: February 11, 2016 01:34 IST

दुष्काळामुळे राज्यात तीव्र पाणी टंचाई जाणवत असल्याने मराठवाडा व अन्य काही ठिकाणच्या जिल्हा रुग्णालयात रुग्णांच्या शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या आहेत. याची गंभीर दखल घेत

मुंबई : दुष्काळामुळे राज्यात तीव्र पाणी टंचाई जाणवत असल्याने मराठवाडा व अन्य काही ठिकाणच्या जिल्हा रुग्णालयात रुग्णांच्या शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या आहेत. याची गंभीर दखल घेत उच्च न्यायालायने दुष्काळग्रस्त भागातील रुग्णालये व शाळांमध्ये पाण्याची काय व्यवस्था केली आहे? अशी विचारणा राज्य सरकारकडे करत याबाबत संपूर्ण माहिती सादर करण्याचा आदेश बुधवारी दिला.शेतकऱ्यांच्या आत्महत्येबाबत उच्च न्यायालयाने ‘स्यु-मोटो’ दाखल करून घेतली आहे. या याचिकेवरील सुनावणी न्या. नरेश पाटील व न्या. अमजद सय्यद यांच्या खंडपीठापुढे होती. मराठवड्यात पिण्याच्या पाण्याची समस्या कायम आहे. पाण्याच्या टंचाईमुळे रुग्णालयांतील शस्त्रक्रियांवर परिणाम होत आहे. अशा स्थितीत सरकारकडे काय अ‍ॅक्शन प्लॅन आहे? पाण्याचे टँकर संबंधित जिल्ह्यांना पुरवले जातात का? तसेच शाळा आणि रुग्णालयांना पाण्याचे टँकर पुरवले जातात का? पाण्याची काय व्यवस्था केली आहे? अशी विचारणा करत खंडपीठाने राज्य सरकारला याबाबत तपशीलवार माहिती देण्याचे निर्देश दिले आहेत. (प्रतिनिधी)एकाच महिन्यात ८९ शेतकऱ्यांच्या आत्महत्या कशा?मराठवाडा सलग तिसऱ्यावर्षी दुष्काळाच्या संकटाला तोंड देत आहे. पिण्यासाठी, शेतीसाठी आणि जनावरांच्या चाऱ्यासाठीही पाणी नसल्याने हताश होऊन गेल्या वर्षभरात मराठवड्यातील एक हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली.तर गेल्या एका महिन्यात ८९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. न्या. नरेश पाटील व न्या. अमजद सय्यद यांच्या खंडपीठाने याची गांभीर्याने दखल घेत एका महिन्या ८९ शेतकऱ्यांच्या ८९ आत्महत्या कशा? अशी विचारणा सरकारकडे करत यासंदर्भात स्पष्टीकरण मागितले आहे.