शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
3
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
4
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
5
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
6
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
7
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
8
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
9
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
10
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
11
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
12
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
13
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
14
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
15
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
16
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
17
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
18
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
19
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
20
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
Daily Top 2Weekly Top 5

अशोक खरात ‘दहावी फेल’; भोंदूला गंडे-दोरे पुरवणारा ‘बाबा’ कोण? विधीसाठी कुठून वस्तू आणल्या?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 07:26 IST

स्वत:ला ‘कॅप्टन’ बिरूद लावणारा अशोक खरात दहावीत दोन विषयांत नापास झाला होता, अशी माहिती असून, त्याची मार्कशीटच समोर आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, नाशिक : विकृत भोंदूबाबा अशोक खरात नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातून विधीसाठी वस्तू आणत होता, अशी चर्चा असल्याने विशेष तपास पथकाने मंगळवारी (दि. २४) इगतपुरी तालुक्यात धडक देत चौकशी केली.

तालुक्यातील नांदगाव बुद्रुक येथे राहणाऱ्या एका स्थानिक बाबाच्या घरी खरात नियमित येत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या दुव्याची शहानिशा करण्यासाठी तपास पथक गावात सखोल चौकशी करणार आहे. तपासादरम्यान आणखी एक गंभीर बाब समोर आली आहे. स्थानिक भोंदूबाबामार्फत खरातला गंडे-दोरे, अंगठ्या यांसारख्या वस्तू पुरवल्या जात असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. खरातच्या आर्थिक व्यवहारांमधून या स्थानिक भोंदूबाबाच्या नावावर इगतपुरी तालुक्यातील विविध गावांमध्ये मालमत्ता खरेदी केल्याचा संशयही तपासात व्यक्त होत आहे.

१ किलोच्या मधासाठी नऊ लाख 

‘तुर्की मध’ म्हणून विक्री करण्यात येणाऱ्या मधाच्या एका किलोसाठी तब्बल नऊ लाख रुपये आकारले जात असल्याची माहिती तपासातून पुढे आली.

खरातची वैद्यकीय चाचणी

मंगळवारी (दि. २४) न्यायालयात हजर करण्यापूर्वी त्याची जिल्हा शासकीय रुग्णालयात तपासणी करून आणण्यात आले होते.

लोकसभा निवडणुकीपूर्वी उत्तर महाराष्ट्रातील एक उमेदवार जो आता खासदार आहे, त्यानेदेखील खरातकडे हजेरी लावल्याची चर्चा आहे. 

खरातच दहावीच्या परीक्षेत गणित विषयात चक्क नापास

स्वत:ला ‘कॅप्टन’ बिरूद लावणारा अशोक खरात दहावीच्या परीक्षेत दोन विषयांत नापास होता, अशी माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे जन्मतारीख सांगितल्यानंतर अंकशास्त्राचा अभ्यास असल्याचे सांगून वार आणि भविष्य सांगत होता, तो खरातच दहावीच्या परीक्षेत गणित विषयात चक्क नापास झाला आहे. 

अशोक खरात याचे मूळ गाव सिन्नर तालुक्यातील कहांडळवाडी (शिवाजीनगर) आहे. तो शिक्षणासाठी वावी येथील शाळेत येत होता. १ जून १९६५ ची जन्मतारीख असलेल्या अशोक खरात याचे शाळेत नाव ‘लक्ष्मण एकनाथ खरात’ असे होते. याच नावाने त्याने मार्च १९८३ मध्ये  दहावीची परीक्षा बैठक क्र. सी-५२३४१ या आसन क्रमांकाने दिली. त्यात खरात दोन विषयांत नापास झाल्याचे दिसून येते. खरात याला मराठी विषयात- ३९, इंग्रजी- ३७, गणित- २८, विज्ञान -६२, समाजशास्त्र-३८, हिंदी-४७ असे एकूण २५१ गुण मिळाले होते. 

अशोक खरातचे शाळेतील नाव ‘लक्ष्मण’ होते. त्यानंतर १९९५ मध्ये त्याने शाळेतून दाखला काढला. त्यानंतर त्याने गॅझेटद्वारे नाव अशोक केले असावे, अशी शक्यता आहे. ही माहिती दोन शाळा सोबतींनी दिली.

कोर्टाबाहेर जोरदार ड्रामा; तृप्ती देसाईंना पोलिसांनी घेतले ताब्यात

नाशिकच्या कोर्टाबाहेर भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांचा ड्रामा लक्षवेधी ठरला. भोंदू अशोक खरात याला न्यायालयात हजर केले, त्याचवेळी प्रचंड कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. खरात याला पाेलिस गाडीतून न्यायालयात आणत असतानाच तृप्ती देसाई यांनी त्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांना तेथेच ताब्यात घेतले. 

खरात याच्या तोंडावर काळ्या रंगाचा बुरखा घालून मंगळवारी (दि. २४) दुपारी नाशिकच्या न्यायालयात आणले.  यावेळी तृप्ती देसाई कार्यकर्त्यांसमवेत अगाेदरच दाखल होत्या.  खरात आल्यानंतर त्यांनी त्याच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे  पोलिसांनी तत्काळ देसाई यांना अडवले.  तर यांच्याबरोबर आलेल्या  विनोद नाठे यांनी खरातच्या अंगावर धावून जात त्याला मारण्याचा प्रयत्न केला. 

खरातसोबत कडूंचा नमस्कार व्हिडिओ; राजकीय वाद पेटला

अमरावती : सध्या सोशल मीडियावर एकच फोटो वाऱ्यासारखा फिरतोय आणि चर्चेला उधाण आलंय ! नाशिकचा तथाकथित भोंदू कॅप्टन अशोक खरात आणि अचलपूरचे ‘फायरब्रँड’ माजी आमदार बच्चू कडू यांचं छायाचित्र सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. एका बाजूला राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी खरात प्रकरणानंतर राजीनामा दिल्याने रान पेटले असताना, बच्चू कडूंचा खरातला वाकून नमस्कार करतानाचा व्हिडीओ भाजप पदाधिकाऱ्याने शेअर केला आणि राजकीय ‘ठिणगी’ पडली.

बच्चू कडू अशोक खरातकडून सत्कार स्वीकारत आहेत आणि चक्क वाकून नमस्कार करत आहेत, असे त्या व्हिडीओमधून स्पष्टपणे दिसून येते. त्यावर तो प्रकार एक्सीडेंटली होता, असं म्हणत कडू यांनी थेट बॅटिंग केली आहे. 

दीपक केसरकरांचा राजीनामा घ्या 

सावंतवाडी : नाशिक येथील भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात प्रकरणात आमदार दीपक केसरकर यांचे नाव आल्याने सावंतवाडीत राजकीय वातावरण तापले आहे. केसरकर यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, या मागणीसाठी उद्धवसेनेने आज शहरात जोरदार मोर्चा काढत केसरकरांविरोधात एल्गार पुकारला. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Ashok Kharat, failed in 10th; who supplied to the fraud?

Web Summary : Fraudster Ashok Kharat, failed in 10th, obtained items from Igatpuri for rituals. A local 'Baba' is suspected of supplying items like amulets. Kharat's financial dealings are under scrutiny, with possible property acquisitions in the Baba's name. Trupti Desai protested at court. Political controversy erupts over Kharat's connections.
टॅग्स :Ashok Kharatअशोक खरातSSC Resultदहावीचा निकालfraudधोकेबाजीPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी