‘तू दिसायला सुंदर, पण नवऱ्याला तुझी क्षमता...’, खरात गोड बोलायचा आणि महिलांना भुलवायचा, त्यानंतर…

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2026 17:04 IST2026-03-29T17:03:45+5:302026-03-29T17:04:36+5:30

Ashok Kharat Case: अशोक खरात हा त्याच्याकडे मार्गदर्शन घेण्यासाठी येणाऱ्या महिलांना कशाप्रकारे भुलवायचा आणि त्यांचं लैंगिक शोषण करायचा याबाबत खळबळजनक माहिती उघडकीस आली आहे.

Ashok Kharat Case: "You look beautiful, but your husband doesn't recognize your potential," Kharat would sweetly talk and seduce women, then... | ‘तू दिसायला सुंदर, पण नवऱ्याला तुझी क्षमता...’, खरात गोड बोलायचा आणि महिलांना भुलवायचा, त्यानंतर…

‘तू दिसायला सुंदर, पण नवऱ्याला तुझी क्षमता...’, खरात गोड बोलायचा आणि महिलांना भुलवायचा, त्यानंतर…

अनेक महिलांचं लैंगिक शोषक केल्या प्रकरणी सध्या अटकेत असलेला भोंदू ज्योतिषी अशोक खरात याची सध्या पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. तसेच खरात याच्या चौकशीमधून धक्कादायक माहिती समोर येत आहे. दरम्यान, अशोक खरात हा त्याच्याकडे मार्गदर्शन घेण्यासाठी येणाऱ्या महिलांना कशाप्रकारे भुलवायचा आणि त्यांचं लैंगिक शोषण करायचा याबाबत खळबळजनक माहिती उघडकीस आली आहे. तू दिसायला सुंदर आहेस, पण तुझ्या नवऱ्याला तुझी क्षमता ओळखता येत नाही, असं गोड बोलून खरात हा महिलांना भुरळ पाडायचा. तसेच नंतर त्यांना आपल्या संभाषणामध्ये गुंतवून त्यांचं लैंगिक शोषण करायचा.

याबबत चौकशीमधून समोर आलेल्या माहितीनुसार अशोक खरातकडे आपल्या समस्या घेऊन यायच्या. तसेच त्यावर तोडगा काढण्यासाठी अशोक खरातचं मार्गदर्शन घ्यायच्या अशावेळी अशोक खरात हा संबंधित महिलांशी गोड बोलून, त्यांच्या सौंदर्याचं, व्यक्तिमत्त्वाचं कौतुक करून त्यांना भुरळ पाडायचा. तू दिसायला खूप सुंदर आहेस, पण तुझ्या नवऱ्याला तुझी क्षमता ओळखता येत नाही, असे बोलून तो महिलांना आपल्या जाळ्यात ओढायचा. तसेच अशा महिला त्याच्या शब्दांच्या अधीन झाल्यानंतर तो त्यांचं शोषण करायचा.

दरम्यान, अशोक खरात याच्या नाशिकमधील कॅनडा कॉर्नर परिसरात असलेल्या कार्यालयातील वैशिष्ट्यपूर्ण काळ्या काचांनीही या प्रकरणाचा तपास करत असलेल्या एसआयटीचं लक्ष वेधून घेतलं आहे. कार्यालयाच्या बाहेरील भागातून केबिनच्या आतले दृश्य दिसू नये याची भोंदू खरातने पुरेपूर काळजी घेतली होती. केबिनसह कार्यालयाची प्रत्येक काच अतिगडद काळ्या रंगाची बसविली आहे. अशा प्रकारे नेपथ्य रचना करून खरातने अनेक महिलांवर लैगिंक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. अति उच्च दर्जाच्या या काळ्याकुट्ट काचांचा दर्जा पाहून तपास पथकही थक्क झाले. कितीही प्रयत्न केला तरी बाहेरून आतमधले काडीमात्र दिसत नव्हते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

Web Title : फर्जी ज्योतिषी अशोक खरात महिलाओं के यौन शोषण के आरोप में गिरफ्तार।

Web Summary : फर्जी ज्योतिषी अशोक खरात महिलाओं का यौन शोषण करने के आरोप में गिरफ्तार। वह उनकी सुंदरता की तारीफ करके और उनके पतियों की सराहना की कमी का विलाप करके उन्हें लुभाता था। खरात के कार्यालय में काली खिड़कियां थीं ताकि उसकी हरकतों को छुपाया जा सके, जिससे एक सोची-समझी योजना का पता चलता है।

Web Title : Fake astrologer Ashok Kharat arrested for sexually exploiting women.

Web Summary : Ashok Kharat, a fake astrologer, is under arrest for sexually exploiting women. He lured them by complimenting their beauty and lamenting their husbands' lack of appreciation. Kharat's office had blacked-out windows to conceal his actions, revealing a calculated scheme.