अशोक खरात वश करण्यासाठी महिलांना नेमकं काय खायला द्यायचा? डॉक्टरांनी चौकशीत दिली धक्कादायक माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 11:26 IST2026-04-02T11:16:17+5:302026-04-02T11:26:21+5:30

Ashok Kharat Case: अशोक खरात हा त्याच्याकडे समस्या घेऊन येणाऱ्या महिलांचं लैंगिक शोषण करण्यापूर्वी त्यांना वश करण्यासाठी नेमकं काय द्यायचा याचा तपास एसआयटीकडून सुरू होता. याबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी एसआयटीने काही डॉक्टरांचीही चौकशी केली असून, यामधून धक्कादायक बाब समोर आली आहे. 

Ashok Kharat Case: What exactly should women be fed to tame Ashok Kharat, doctor gives shocking information during interrogation | अशोक खरात वश करण्यासाठी महिलांना नेमकं काय खायला द्यायचा? डॉक्टरांनी चौकशीत दिली धक्कादायक माहिती 

अशोक खरात वश करण्यासाठी महिलांना नेमकं काय खायला द्यायचा? डॉक्टरांनी चौकशीत दिली धक्कादायक माहिती 

अनेक महिलांचं लैंगिक शोषण करणारा भोंदू ज्योतिषी अशोक खरात याला आज न्यायालयात हजर केलं जाणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तव अशोक खरात याला व्हिडीओ कॉन्फ्रन्सिंगद्वारे कोर्टात हजर केलं जाणार आहे. दरम्यान, अशोक खरात हा त्याच्याकडे समस्या घेऊन येणाऱ्या महिलांचं लैंगिक शोषण करण्यापूर्वी त्यांना वश करण्यासाठी नेमकं काय द्यायचा याचा तपास एसआयटीकडून सुरू होता. याबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी एसआयटीने काही डॉक्टरांचीही चौकशी केली असून, यामधून धक्कादायक बाब समोर आली आहे.

अशोक खरातने केलेल्या लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या पीडित महिलांना त्याने नेमकं कोणतं औषध देऊन वश केलं होतं याची माहिकी मिळवण्यासाठी एसआयटीने काही डॉक्टरांची चौकशी केली आहे. अशोक खरात याने या महिलांना ओशने जल या तीर्थाच्या नावाखाली गुंगी येणारी औषधे आणि वेदनाशामक गोळ्या दिल्याचे या चौकशीमधून उघडकीस आले आहे. एवढंच नाही तर अशोक खरात याने लैंगिक शोषणामुळे गर्भवती राहिलेल्या एका महिलेला गर्भपाताच्या गोळ्याही दिल्या होत्या, अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान, ही माहिती आज न्यायालयासमोर सादर केली जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, गुप्तधन मिळेल, आयुष्यात प्रगती होईल किंवा अपत्यप्राप्ती होईल, आर्थिक अडचणीतून बाहेर याल, पतीला नोकरी लागेल, मनासारखा पती मिळेल हे प्रश्न घेऊन भोंदू अशोक खराकडे जाणाऱ्या महिलांची संख्या ८० टक्के होती, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. व्यापाऱ्यात प्रगती होत नाही, नोकरीत प्रमोशन हवं, राजकरणात महत्त्वाचे पद कधी मिळेल, उमेदवारी मिळविण्यासाठी उपाय हे प्रश्न घेऊन व्यापारी, उच्च पदस्थ अधिकारी, राजकीय मंडळी भोंदू खरातच्या पायऱ्या झिझवत असत, असेही उघडकीस आले आहे.

Web Title : ज्योतिषी अशोक खरात के नशीली दवाओं के राज़, डॉक्टरों की गवाही में खुलासा।

Web Summary : महिलाओं का यौन शोषण करने के आरोपी अशोक खरात ने पीड़ितों को वश में करने के लिए नशीली दवाओं से युक्त 'पवित्र जल' और दर्द निवारक दवाओं का इस्तेमाल किया। उस पर गर्भपात की गोलियां देने का भी आरोप है। एसआईटी जांच में डॉक्टरों के साक्षात्कार के दौरान यह खुलासा हुआ। यह जानकारी अदालत में पेश की जाएगी।

Web Title : Astrologer Ashok Kharat's drugging secrets revealed in shocking doctor testimonies.

Web Summary : Ashok Kharat, accused of sexually exploiting women, used sedative-laced 'holy water' and painkillers to subdue victims. He also allegedly provided abortion pills. The SIT investigation revealed this during doctor interviews. This information will be presented in court.