Ashok Kharat Case: भोंदू ज्योतिषी अशोक खरात याच्या SIT चौकशीबाबत घेण्यात आला मोठा निर्णय, आता...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2026 15:49 IST2026-03-22T15:47:35+5:302026-03-22T15:49:43+5:30

Ashok Kharat Case:अनेक महिलांचं लैंगिक शोषण केल्याप्रकरणी पोलिसांनी अटकेची कारवाई केलेला भोंदू ज्योतिषी अशोक खरात याची सध्या एसआयटीकडून कसून चौकशी केली जात आहे. अशोक खरात याचे काही राजकीय नेत्यांबरोबरच इतर बड्या लोकांशीही संबंध असल्याचे उघडकीस आल्याने या प्रकरणाचं गांभीर्य अधिकच वाढलं आहे.

Ashok Kharat Case: A big decision has been taken regarding the SIT investigation of fake astrologer Ashok Kharat, now... | Ashok Kharat Case: भोंदू ज्योतिषी अशोक खरात याच्या SIT चौकशीबाबत घेण्यात आला मोठा निर्णय, आता...

Ashok Kharat Case: भोंदू ज्योतिषी अशोक खरात याच्या SIT चौकशीबाबत घेण्यात आला मोठा निर्णय, आता...

अनेक महिलांचं लैंगिक शोषण केल्याप्रकरणी पोलिसांनी अटकेची कारवाई केलेला भोंदू ज्योतिषी अशोक खरात याची सध्या एसआयटीकडून कसून चौकशी केली जात आहे. अशोक खरात याचे काही राजकीय नेत्यांबरोबरच इतर बड्या लोकांशीही संबंध असल्याचे उघडकीस आल्याने या प्रकरणाचं गांभीर्य अधिकच वाढलं आहे. याचदरम्यान, अशोक खरातच्या सध्या सुरू असलेल्या एसआयटी चौकशीचं ठिकाण बदलण्यात आलं आहे.

लैंगिक शोषण प्रकरणी अटक करण्यात आलेल्या अशोक खरातची नाशिकमधील पोलीस हेडक्वाटर्समधील हिमांशू पोलीस क्लब येथे  गेल्या तीन दिवसांपासून चौकशी केली जात होती. दरम्यान, आता पोलिसांनी अशोक खरात याच्या चौकशीचं ठिकाण बदललं असून, आता त्याला अज्ञात स्थळी नेऊन त्याची चौकसी केली जात आहे. दरम्यान, अशोक खरात याची काल सुमारे ७ तास चौकशी करण्यात आली होती.  सध्या एसआयटीच्या प्रमुख तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली अशोक खरात याची चौकशी सुरू असून, या प्रकरणामध्ये आणखी काही जणांचीही चौकशी होण्याची शक्यता आहे. 

दुसरीकडे अशोक खरातच्या चौकशीमधून त्याने महिलांसोबत केलेल्या विकृत वर्तनाबाबतही धक्कादायक माहिती समोर येत आहे. अशोक खरात याच्या कारकिर्दीची सुरुवात ही मर्चेंट नेव्हीमधून झाली. जगभर फिरल्यामुळे त्याने इंग्रजीसह अनेक परदेशी भाषा आत्मसात केल्या. भारतात परतल्यानंतर त्याने दक्षिण भारतीय भाषांवरही प्रभुत्व मिळवले. याच काळात त्याने अंकशास्त्र या विषयाचा अभ्यास करून लोकांचे भविष्य सांगण्यास सुरुवात केली. हळूहळू या अंकशास्त्राला त्याने भोंदूपणाची जोड दिली. माझ्या शरीरात प्रत्यक्ष महादेव येतात, असे सांगून त्याने लोकांच्या मनात भीती आणि श्रद्धा यांचे अजब मिश्रण तयार केले. ब्लॅक मॅजिकच्या अफवा पसरवून त्याने अनेकांना मानसिक गुलाम बनवले होते.

खरातचा प्रभाव इतका मोठा होता की, नाशिकमधील त्याचे ऑफिस आणि सिन्नरमधील त्याचे देवस्थान येथे महाराष्ट्रातील बड्या नेत्यांची आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची ये-जा होती. एवढंच नाही तर खरातने महिलांना फसवण्यासाठी अत्यंत क्रूर पद्धत अवलंबली होती. नोकरी, घरगुती समस्या किंवा अपत्यप्राप्तीसाठी येणाऱ्या महिलांना तो विशिष्ट पूजेसाठी नाशिकमधील त्याच्या ऑफिसमध्ये किंवा शेतात बोलवायचा. पूजा न केल्यास पतीचा मृत्यू होईल किंवा मुलाचे नुकसान होईल, अशी भीती घालून तो महिलांशी शरीरसंबंध ठेवायचा. काही महिलांना त्याने लग्नाचे आमिष दाखवले, तर काहींना अंकशास्त्राच्या नावाने ब्लॅकमेल केले. एका पीडितेने दिलेल्या जबाबानुसार, सांगतोय ते करायला नकार दिल्यास पतीचे आयुष्य कमी होईल, अशी धमकी देऊन खरातने तिचे लैंगिक शोषण केल्याही माहितीही उघडकीस आली आहे. 

Web Title : अशोक खरात मामला: गंभीर आरोपों के बीच एसआईटी जांच का स्थान बदला गया

Web Summary : महिलाओं के यौन शोषण के आरोपी ढोंगी ज्योतिषी अशोक खरात की एसआईटी जांच एक अज्ञात स्थान पर स्थानांतरित कर दी गई है। गिरफ्तारी के बाद खरात के राजनीतिक संबंधों और चालाकी भरी रणनीति की जांच की जा रही है। जांच में भय और अंधविश्वास का उपयोग करके महिलाओं के शोषण के उसके क्रूर तरीके सामने आए हैं।

Web Title : Ashok Kharat Case: SIT Investigation Location Changed Amidst Serious Allegations

Web Summary : The SIT investigation into fake astrologer Ashok Kharat, accused of sexually exploiting women, has been moved to an undisclosed location. Kharat's political connections and manipulative tactics are under scrutiny following his arrest. Investigation reveals his cruel methods of exploiting women using fear and superstition.