शहरं
Join us  
Trending Stories
1
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
2
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
3
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
4
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
5
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
6
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
7
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
8
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
9
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
10
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
11
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
12
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
13
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
14
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
15
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
16
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
17
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
18
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
19
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
20
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले- अशोक चव्हाण

By admin | Updated: July 26, 2015 02:02 IST

केंद्रीय कृषीमंत्री राधामोहनसिंह यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्येसंदर्भात केलेले विधान संतापजनक असून केंद्रातील असंवेदनशील शासनाने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे,

नांदेड : केंद्रीय कृषीमंत्री राधामोहनसिंह यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्येसंदर्भात केलेले विधान संतापजनक असून केंद्रातील असंवेदनशील शासनाने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे, असे टीकास्त्र माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा़ अशोक चव्हाण यांनी मांडली़.राधामोहनसिंह यांच्या विधानाचा काँग्रेसतर्फे निषेध करण्यात येत असून सभागृहातही त्याचा जाब विचारणार असल्याचे चव्हाण यांनी पत्रपरिषदेत सांगितले. शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या गंभीर विषय आहे़ त्यांना दिलासा देण्याऐवजी केंद्रीय कृषीमंत्री शेतकऱ्यांच्या आत्महत्या या प्रेमप्रकरण, व्यसनाधिनता यामुळे होतात, असे विधान करतात़ केंद्रीय अहवालानुसार सर्वात जास्त २,५०० पेक्षाही अधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रात झाल्या आहेत़ मात्र सभागृहात हा आकडा फक्त तीन सांगण्यात आला़ त्यावर मी सत्ताधाऱ्यांना अभ्यास करण्याचा सल्ला दिला होता़ शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळालीच पाहिजे़ त्यासाठी आंदोलनेही केली़, परंतु शासनाने मात्र अद्यापही दखल घेतलेली नाही, असेही ते म्हणाले.आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांना तातडीने दिलासा मिळावा म्हणून कर्जमाफी द्यावी आणि त्यानंतर दीर्घकालीन उपाययोजना कराव्यात, अशी आमची भूमिका आहे. परंतु मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफी देणारच नसल्याचे सांगितले़ यावरुन सरकारचा दृष्टिकोन असंवेदनशील असल्याचे दिसते़ त्याबाबत सभागृहात जाब विचारणार असल्याचेही ते म्हणाले़शेतीमालाला उत्पादन खर्चावर भाव, कर्जमाफी आदींबाबत निवडणुकीच्या तोंडावर आश्वासने देण्यात आली़ धनगर आरक्षणाच्या मुद्याचाही सरकारला विसर पडला आहे़, परंतु आश्वासनांची त्यांना वेळोवेळी आठवण करुन देणार असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)कृत्रिम पाऊस पाडण्याच्या संदर्भात हालचाली सुरु असून त्यातून नांदेड जिल्हा वगळणार असल्याची माहिती आहे़ प्रत्यक्षात संपूर्ण मराठवाड्यात दुष्काळ आहे़ त्यामुळे दुष्काळाच्या संदर्भात तरी मराठवाड्यात असा भेदभाव करु नका़ सर्वच जिल्ह्यांमध्ये हा प्रयोग करावा, अशी मागणीही शासनाकडे करणार असल्याचे खा़ चव्हाण म्हणाले़. अगोदर राजीनामे नंतर चर्चाचर्चेविना संसदेचे कामकाज ठप्प असल्याच्या मुद्यावर खा़ चव्हाण म्हणाले, भ्रष्टाचाराचे आरोप असणाऱ्यांनी अगोदर राजीनामे द्यावेत. त्यानंतर आम्ही चर्चेला तयार आहोत़ राजीनामे न देता आम्ही चर्चा करणे हे त्यांचे समर्थनच ठरेल़ काँग्रेसच्या काळात फक्त आरोपांवरुन अनेकांना राजीनामे द्यावे लागले होते़