शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
3
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
5
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
6
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
7
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
8
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
9
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
10
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
11
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
12
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
13
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
14
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
15
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
16
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
17
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
18
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
19
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
20
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर

जुन्या, दुर्मीळ झाडाला मिठी मारून आषाढीवारी; सह्याद्री देवराईचा राज्यभरात उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2020 6:53 PM

या चळवळीतून गावातील, तालुक्यातील, जिल्ह्यातील, राज्यातील सर्वात जुनी झाडे आपल्याला मिळणार

ठळक मुद्देराज्यभरातून वृक्षांच्या माहितीचे संकलन  

पुणे : सध्या अनेक दुर्मीळ झाडे कमी होत आहेत. त्यात औषधी वनस्पतींचाही समावेश आहे. ही झाडे वाढावीत, यासाठी अभिनेते सयाजी शिंदे यांच्या 'सह्याद्री देवराई'तर्फे जुनी झाडे वाचविण्याची मोहिम सुरू केली आहे. प्रत्येकाने आपल्या परिसरातील खूप जुन्या झाडांना मिठी मारून त्याचा फोटो सह्याद्री देवराईकडे पाठवायचा आहे. राज्यभरातील ही माहिती संकलित करून आषाढीच्या दिवशी त्या वृक्षांचा उत्सव साजरा होणार आहे.अभिनेते सयाजी शिंदे आणि चित्रपट लेखक अरविंद जगताप यांनी राज्यभरातील जी काही खुप जुनी झाडे आहेत. त्यांची माहिती एकत्र करण्यासाठी सह्याद्री देवराई कडून दोन मोबाईल नंबर दिले आहेत. नागरिकांनी सह्याद्री देवराई-  ९०९६६४४६७१ यावर आपला जुन्या झाडासोबतचा झाडाला मिठी मारलेला फोटो आणि ते झाड किती वर्षे जूनं आहे, ते कुठे आहे.  

नागरिकांनी फोटोसह झाडे कुठे आहे ? त्यांची परिस्थिती काय आहे? त्याची माहिती द्यायची आहे. २ जुलैच्या आत ही संपूर्ण माहिती सह्याद्री देवराईच्या व्हॉट्सअप नंबरवर पाठवायची आहे. या चळवळीतून गावातील, तालुक्यातील, जिल्ह्यातील, राज्यातील सर्वात जुनी झाडे आपल्याला मिळणार आहेत.===============जुन्या, दुर्मीळ दहा झाडांचे सेलिब्रेशनयंदाची आषाढीवारी अनोख्या पद्दतीने साजरी करण्याचा निश्चय केला आहे. या आषाढी वारीला या सर्व फोटोंचा डाटा एकत्र करण्यात येणार असून. यातील सर्वात जुन्या दहा झाडांचे सेलिब्रेशन करण्यात येणार आहे. यानिमित्ताने तुम्हांला तुमच्या गावातील, तालुक्यातील, जिल्ह्यातील, राज्यातील सर्वांत जुन्या झाडांची माहिती  मिळणार आहे. लहान-थोरांपासून सर्वांनी या उपक्रमा सहभागी झाले पाहिजे. कारण झाड हा एक देवच आहे. त्यामुळे आपण जीवंत आहोत. त्यामुळे तुमच्या परिसरातील जुन्या झाडांना मिठी मारून फोटो पाठवा.- सयाजी शिंदे, अभिनेते   

टॅग्स :Puneपुणेenvironmentपर्यावरणsayaji shindeसयाजी शिंदे