शहरं
Join us  
Trending Stories
1
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
2
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
3
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
4
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
5
बाबा वेंगाची सोन्याबाबत मोठी भविष्यवाणी; पाहा आता दरांबाबत काय म्हटलंय? खरं झालं तर...
6
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले...
7
"तुमच्यापाशी दुसरा तुल्यबल विचारच नाही..."; कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या सूनेने संजय गायकवाडांना सुनावले
8
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
9
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला; आमदार-प्रकाशक संघर्षातून राज्यात नवे राजकीय वादळ
10
'भुजिया किंग' शिवरतन अग्रवाल यांचे निधन; शुन्यातून उभारले हजारो कोटींचे साम्राज्य...
11
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
12
Gondia Crime: 'तुला जिवे मारीन' म्हणत हात-पाय बांधून शाळेत डांबले; लग्नासाठी अल्पवयीन मुलीचे अपहरण
13
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
14
आता खासगी शाळांमध्येही फक्त NCERT पुस्तके, महागड्या पुस्तकावर बंदी; NHRC ने राज्यांना दिला ३० दिवसांचा वेळ
15
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
16
Trinamool Congress vs BJP: तृणमूल अन् भाजप यांच्यात थेट लढत; ‘तिसरी आघाडी’मुळे कोणाचा स्वप्नभंग
17
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
18
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
19
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
20
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
Daily Top 2Weekly Top 5

कृत्रिम पावसाच्या प्रयोगाची सांगता!

By admin | Updated: October 20, 2015 00:23 IST

कृत्रिम पावसाच्या प्रयोगाची पुढच्या आठवड्यात सांगता होणार असून, सी बॅण्ड डॉप्लर रडार, विमान, फ्लेअर्स व इतर सामग्री हलविण्यात येणार आहे. ढगांनी दगा दिल्याने प्रयोगाला

औरंगाबाद : कृत्रिम पावसाच्या प्रयोगाची पुढच्या आठवड्यात सांगता होणार असून, सी बॅण्ड डॉप्लर रडार, विमान, फ्लेअर्स व इतर सामग्री हलविण्यात येणार आहे. ढगांनी दगा दिल्याने प्रयोगाला अपेक्षित यश मिळालेले नाही. एकूण ९० दिवसांचा हा प्रयोग होता. परंतु आता ढगच नसल्याने प्रयोग थांबविण्यात येत आहेत, असे राज्य आपत्ती संचालक सुहास दिवसे यांनी सांगितले.१४ दिवसांपासून विमान उभे असून, ढगांअभावी त्याचे कुठेही उड्डाण झालेले नाही. हवामान खात्याने मान्सून संपल्याचे जाहीर केले आहे. परिणामी, २७ कोटी रुपये खर्चातून हाती घेण्यात आलेला कृत्रिम पावसाचा प्रयोग आता थांबवावा लागणार आहे. प्रयोग संपण्याची अधिकृत तारीख ४ नोव्हेंबर असली तरी आता पावसाळी ढग दाटून येण्याची शक्यता नाही. त्यामुळे प्रयोग आधीच गुंडाळण्यात येणार आहे.सुमारे ११० तास विमानाने प्रयोग करून ९५० मि.मी.पर्यंत पाऊस पाडल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. कराराच्या ५० टक्केच उड्डाण झाले असून, १३ कोटी ५० लाख रुपयांचा जास्तीचा खर्च सरकारला कंत्राटदार कंपनीला द्यावा लागणार आहे. २७ कोटींमध्ये ९० दिवस क्लाऊड सीडिंगचा प्रयोग करण्याचे कंत्राट देण्यात आले आहे. ४ आॅगस्टला प्रयोगाला सुरुवात झाली. आॅगस्ट महिन्यात १९, सप्टेंबरमध्ये ११ दिवस क्लाऊड सीडिंग करण्यात आले. आॅक्टोबरमध्ये ५ दिवस विमानाने उड्डाण घेतले. आॅगस्टमध्ये २५४ तर सप्टेंबरमध्ये २५२ मि.मी. पाऊस कृत्रिम प्रयोगातून झाल्याचा दावा करण्यात आला आहे. आॅगस्टमध्ये ३४८, सप्टेंबरमध्ये २०१ असे ५४९ फ्लेअर्स ढगांमध्ये सोडण्यात आले. (प्रतिनिधी)पुढच्या आठवड्यात प्रयोग थांबेल. रडारच्या साह्याने तयार करण्यात आलेला डाटा हवामान खात्याला देण्यात येणार आहे. त्याचे विश्लेषण करण्यात येईल. पुढच्या वर्षी त्याचा फायदा होईल. जून २०१६मध्ये प्रयोगाची यंत्रणा तयार असेल. कंपनीला २७ कोटी रुपये द्यावे लागतील. अजून तीन दिवस यंत्रणा औरंगाबादेत राहणार आहे, असे दिवसे यांनी सांगितले.