शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

'खंबाटातील कामगारांच्या दुरवस्थेला सेनाच जबाबदार'

By admin | Updated: January 7, 2017 06:13 IST

मराठी कामगारांना रस्त्यावर आणल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार किरण पावसकर यांनी शुक्रवारी केला.

मुंबई : खंबाटा प्रकरणात सध्या मध्यस्थी करणारी शिवसेना आणि त्याचे खासदार विनायक राऊत यांनीच खंबाटा एव्हिएशनमधील मराठी कामगारांना रस्त्यावर आणल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार किरण पावसकर यांनी शुक्रवारी केला. मुंबई विमानतळावर ग्राउंड हॅण्डलिंग एजंट म्हणून काम करणारी खंबाटा एव्हिएशन ही कंपनी आॅगस्ट २०१६ मध्ये तडकाफडकी बंद करण्यात आली. सुमारे २१०० कामगारांचा दहा महिन्यांचा पगार, भविष्यनिर्वाह निधी आणि अन्य भत्ते मिळून तब्बल ४०० कोटींहून अधिक रक्कम कंपनीने थकविली आहे. केवळ स्वत:च्या फायद्यासाठी विनायक राऊत आणि शिवसेनेने या कामगारांना देशोधडीला लावल्याचा आरोप पावसकर यांनी केला. खंबाटातील कामगारांची मान्यताप्राप्त संघटना शिवसेनेचीच असून तिचा कारभार विनायक राऊतांकडे होता. आपल्याच कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडून खंबाटाच्या विक्रीसाठी राऊत यांनी प्रयत्न करणे संशयास्पद असून या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी पावसकर यांनी केली. बर्ड वर्ल्डवाइड फ्लाइट सर्व्हिसेस (बीडब्ल्यूएफएस) या कंपनीने मुंबई विमानतळावरील ग्राउंड हॅण्डलिंगचे काम घेतले. या कंपनीस खंबाटा स्वत:ची वाहने आणि उपकरणे वापरण्यास देते. खंबाटातील कामगारांना बाहेरचा रस्ता दाखविणारी बीडब्ल्यूएफएस खंबाटाची वाहने आणि उपकरणे वापरत असल्याची बाब शिवसेनेला दिसली नाही का, याचा खुलासा व्हायला हवा, असे पावसकर म्हणाले. (प्रतिनिधी)>कामगारांवर अन्यायदरम्यान, मुंबई विमानतळावरील खंबाटाची २०८ वाहने जप्त करण्यात आली. बीडब्ल्यूएफएसने स्वत:चा लोगो डकवून ही वाहने वापरात आणली होती. याशिवाय, बीडब्ल्यूएफएसची पाच उपकरणे लिलावात काढण्याचा तसेच खंबाटाने जीव्हीकेला दिलेले ४० कोटी कामगार आयुक्तांमार्फत कामगारांकडे देण्याचा निर्णय झाल्याची माहिती सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी दिली. दमानिया यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेत कामगारांवरील अन्यायाचा मुद्दा ऐरणीवर आणला होता.