शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
3
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
4
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
5
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
6
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
7
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
8
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
9
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
10
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
11
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
12
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
13
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
14
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
15
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
16
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
17
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
18
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
19
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
20
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
Daily Top 2Weekly Top 5

आणखी एकजण ताब्यात

By admin | Updated: December 6, 2014 02:10 IST

जवखेडे हत्याकांडात आणखी एका आरोपीला शुक्रवारी ताब्यात घेण्यात आल्याचे समजते. दरम्यान, ताब्यात घेण्यात आलेल्या या संशयिताची कसून चौकशी सुरू

अहमदनगर : जवखेडे हत्याकांडात आणखी एका आरोपीला शुक्रवारी ताब्यात घेण्यात आल्याचे समजते. दरम्यान, ताब्यात घेण्यात आलेल्या या संशयिताची कसून चौकशी सुरू असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. हा दुसरा संशयित यापूर्वी अटकेत असलेल्या प्रशांत जाधवचा जवळचा नातेवाईक असल्याची माहिती आहे.जवखेडे खालसा येथील तिहेरी हत्याकांडातील फिर्यादी व मयत संजय जाधव यांचा पुतण्या प्रशांत जाधव याला पोलिसांनी बुधवारी रात्री अटक केली होती. त्याला पाथर्डी न्यायालयाने दहा दिवसांच्या कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, प्रशांतकडे पोलीस कसून चौकशी करीत आहेत. त्याच्याकडून हत्याकांडाचा सविस्तर उलगडा होण्याची शक्यता असून, मिळालेल्या पुराव्याच्या आधारे पोलीस संशयितांना अटक करीत आहेत. शुक्रवारी दुपारी आणखी एका जवळच्या नातेवाईकाला अटक करण्यात आली आहे. त्यामुळे दोनच दिवसांत हत्याकांडातील दुसऱ्या आरोपिला अटक करण्यात पोलिसांना यश आल्याचे समजते. दरम्यान, विशेष पोलीस महानिरीक्षक प्रवीण साळुंके म्हणाले, तपास सुरू आहे. या प्रकरणात आणखी दुसऱ्या कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे, मात्र त्याला अटक केलेली नाही. (प्रतिनिधी)> सीबीआय चौकशीची नामुष्की टळलीमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जवखेडे खालसा येथे भेट देऊन निश्चित वेळेत तपास झाला नाही तर प्रकरण चौकशीला सीबीआयकडे सोपविले जाईल, असे संकेत दिले होते. तशी घोषणा हिवाळी अधिवेशनात केली जाण्याची शक्यता होती. त्यामुळे पोलिसांनी जलदगतीने काही फासे टाकले आणि त्यामध्ये आरोपी गळाला लागले. वेळेवर मिळालेला नार्को चाचणीचा अहवाल आरोपीपर्यंत पोहचविण्यात पोलिसांच्या मदतीला आला. त्यामुळे अधिवेशन सुरू होण्याच्या आधीच हत्याकांडाचा उलगडा झाला आहे, असा दावा पोलिसांनी केला.