शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

चवदार सत्याग्रहाचा आज वर्धापन दिन

By admin | Updated: March 19, 2015 22:23 IST

अस्पृश्याच्या भिंती गाडून पददलितांना न्याय मिळवून देण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह करून सामाजिक क्रांतीचे रणशिंग फुंकले.

भीमसागर लोटणार : ऐतिहासिक घटनेला लोटली ८८ वर्षेमहाड : अस्पृश्याच्या भिंती गाडून पददलितांना न्याय मिळवून देण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह करून सामाजिक क्रांतीचे रणशिंग फुंकले. त्या ऐतिहासिक घटनेचा ८८ वा वर्धापन दिन आज महाडमध्ये साजरा करण्यात येणार असून यानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी महाडमध्ये भीमसागर लोटणार आहे.१९ मार्च १९२७ रोजी डॉ. आंबेडकरांनी महाडमध्ये पहिली कुलाबा जिल्हा बहिष्कृत परिषद घेतली होती. तर २० मार्च १९२७ रोजी चवदार तळ्याचे पाणी प्राशन करून तळ्याचा सत्याग्रह केला होता. या ऐतिहासिक घटनांच्या वर्धापनदिनी आंबेडकरी जनता आपल्या लाडक्या भीमरायाला वंदन करण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून महाडमध्ये दाखल होत आहेत. समता सैनिक दलाचे क्रांतीस्तंभावर संचलन स. ९ वा. होणार असून स. ११ वा. याच ठिकाणी बौद्धजन पंचायत समितीचे सभापती आनंदराज आंबेडकर यांची सभा होणार आहे. तसेच भारिप बहुजन महासंघ अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे प्रा. जोगेंद्र कवाडे, गंगाराम इंदिसे, माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे, रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. रामदास आठवले, मनोज संसारे आदिंच्या वेगवेगळ्या अभिवादन सभा होणार आहेत.यानिमित्त संपूर्ण महाड शहरात मोठ्या प्रमाणावर बॅनरबाजी करण्यात आलेली असून नगरपरिषदेमार्फत उपस्थित भीमसैनिकांसाठी सर्व सुविधा सज्ज करण्यात आल्या आहेत. चवदार तळे व क्रांतिभूमी परिसरात सर्वत्र दुकाने थाटण्यात आली असून या परिसराला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाल्याचे दिसून येत आहे. (वार्ताहर)