शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

अण्णा हजारे यांची नवाब मलिक यांना नोटीस ; पुरावे द्या नाही तर माफी मागा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2019 6:02 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी अण्णा हजारे हे पैसे घेऊन उपोषण करतात, असा आरोप केला होता़.

ठळक मुद्देअण्णा हजारे हे राळेगण सिध्दी येथे ३० जानेवारी २०१९ पासून बेमुदत आमरण उपोषण

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी अण्णा हजारे हे पैसे घेऊन उपोषण करतात, असा आरोप केला होता़. त्याबाबत हजारे यांच्यावतीने बदनामी आणि फौजदारी कारवाईची कायदेशीर नोटीस नवाब मलिक यांना पाठविण्यात आली आहे़.  मलिक यांनी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना हजारे संघाचे एजंट असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माफी मागितली होती़. मात्र, नवाब मलिक यांनी यावर कोणतेही मत व्यक्त केले नाही़. त्यामुळे अण्णा हजारे यांची वकिल मिलिंद पवार यांनी नवाब मलिक यांना कायदेशीर नोटीस पाठविली आहे़. या नोटीशीत त्यांनी म्हटले आहे की, लोकपाल व लोक आयुक्ताच्या नियुक्तीचा कायदा संमत होऊनही त्याची अंमलबजावणी न झाल्याने जेष्ठ समाज सेवक अण्णा हजारे हे राळेगण सिध्दी येथे ३० जानेवारी २०१९ पासून बेमुदत आमरण उपोषणा साठी यादवबाबा मंदिरात बसले आहेत. अण्णा हजारे यांच्या उपोषणाला सुरूवात झाल्यानंतर नुकतेच अण्णा हजारे यांच्याविषयी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी ह्यअण्णा हजारे हे संघ परिवाराकडून पैसे घेऊन उपोषणे करतात व वकीलांकडून पैसे घेऊन उपोषणाला बसतात अशी बदनामी कारक व धादांत खोटी वक्तव्ये एका वृत्त चित्रवाहिनीवर चर्चा करताना केली़. अद्याप स्वत: नवाब मलिक यांनी त्यांनी केलेल्या वक्तव्याविषयी कुठलाही खुलासा केलेला नाही. त्यामुळे ते वक्तव्य त्यांचे वैयक्तिक होते किंवा पक्षाचे होते तसेच नवाब मलिक यांच्या कडे कुठलाही पुरावे नसताना धादांत खोटे व बदनामी कारक ती वक्तव्य होती, फक्त राजकीय फायदा डोळ्यासमोर ठेवून जाणीवपूर्वक अण्णा हजारे यांच्या विषयी बदनामी करण्याचे उद्देशाने व अण्णांविषयी समाजात चुकीचा समज निर्माण व्हावा. नवाब मलिक यांनी वरील वक्तव्य केल्याने अण्णा हजारे यांनी त्यांचे वकील मिलींद दत्तात्रय पवार यांच्या वतीने नवाब मलिक यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे.    नोटीस पाठवून अण्णा हजारे यांची नवाब मलीक यांनी जाहीर लेखी माफी मागावी व तसा खुलासा करावा़ तसे न केल्यास फौजदारी व दिवाणी स्वरूपाचे खटले व दावे मलिक यांच्या विरोधात दाखल करावे लागतील असा इशारा कायदेशीर नोटीस रजिस्टर्ड पोस्टाने पाठवून मलिक यांना दिला आहे.

टॅग्स :Puneपुणेanna hazareअण्णा हजारेNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliceपोलिस