गावित, पाचपुतेंच्या भाजपा प्रवेशावर अण्णा नाराज

By Admin | Updated: September 7, 2014 02:08 IST2014-09-07T02:08:05+5:302014-09-07T02:08:05+5:30

विजयकुमार गावीत व बबनराव पाचपुते यांच्या भाजपा प्रवेशावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी श्निवारी नाराजी व्यक्त केली आहे.

Anna, angry at Gavit, Panchapatan BJP entry | गावित, पाचपुतेंच्या भाजपा प्रवेशावर अण्णा नाराज

गावित, पाचपुतेंच्या भाजपा प्रवेशावर अण्णा नाराज

पारनेर (जि.अहमदनगर) :  ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहेत अशा नेत्यांना एक पक्ष काढून टाकतो तर दुसरा पक्ष पायघडय़ा का टाकतो, असा प्रश्न उपस्थित करून विजयकुमार गावीत व बबनराव पाचपुते यांच्या भाजपा प्रवेशावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी श्निवारी नाराजी व्यक्त केली आहे.
ते म्हणाले, ज्या लोकांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत अशा लोकांवर काही प्रमाणात आरोप सिद्ध झाले तरी राजकीय पक्ष यापासून काही धडा घेत नसल्यानेच  एका पक्षातून दुस:या पक्षात प्रवेश दिला जातो ही दुर्दैवाची गोष्ट असून, आता त्यांना जनता धडा शिकविल्याशिवाय राहणार नसल्याचा विश्वास मला वाटत आहे. यात भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या लोकांना पक्षात प्रवेश देण्यासोबत उमेदवारी बहाल केली जात असल्याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. (तालुका प्रतिनिधी)

 

Web Title: Anna, angry at Gavit, Panchapatan BJP entry