anil parab says st will do arrangements for oxygen and create green corridor | आता एसटीचे ड्रायव्हर आणणार ऑक्सिजन टँकर: अनिल परब

आता एसटीचे ड्रायव्हर आणणार ऑक्सिजन टँकर: अनिल परब

ठळक मुद्देऑक्सिजन आणण्यासाठी ग्रीन कॉरिडॉर एसटीचे ड्रायव्हर आणणार ऑक्सिजन टँकरऑक्सिजन टँकर वाहतुकीत अडथळा येणार नाही - परब

मुंबई: रेमडेसिवीर इंजेक्शन, ऑक्सिजन, बेड्सची कमतरता, कोरोना लसींचा तुडवडा यांवरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहे. केंद्र आणि राज्य सरकार एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. केंद्राने ऑक्सिजन आणण्यासाठी राज्य सरकारला परवानगी दिली आहे. रेल्वेकडून तर ऑक्सिजन एक्स्प्रेस सोडली जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले. मात्र, ऑक्सिजन आणण्यासाठी राज्य सरकारला ड्रायव्हर मिळत नसल्याची बाब उघड झाली आहे. या पार्श्वभूमीवर आता एसटीचे ड्रायव्हर ऑक्सिजन टँकर आणतील, अशी माहिती परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिली. (anil parab says st will do arrangements for oxygen and create green corridor)

अनिल परब यांनी एका पत्रकार परिषदेत याविषयीची माहिती दिली. राज्यात ऑक्सिजनची गरज आहे, त्या ठिकाणी ते पोहोचवण्यासाठी ग्रीन कॉरिडॉर केला जाणार आहे. यामुळे कुठल्याही अडथळ्याशिवाय ऑक्सिजनचे टँकर इच्छितस्थळी लवकर पोहोचतील. कोणत्याही परिस्थितीत ऑक्सिजन टँकर वाहतुकीत अडथळा येणार नाही, अशी ग्वाही अनिल परब यांनी यावेळी दिली. 

“कोरोनाच्या काळात पंतप्रधान मोदी १८-१९ तास काम करतायत, राजकारण करू नका”

लॉकडाऊनमुळे टँकर्स ड्रायव्हर गावी गेले

राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे रेल्वे मंत्रालयाकडून ऑक्सिजनचा पुरवठा होत आहे. यासाठी समन्वय साधण्याचे काम परिवहन विभाग करत आहे. लॉकडाऊनमुळे टँकर्स ड्रायव्हर गावाला निघून गेले आहेत. त्यामुळे ड्रायव्हर्सचा तुटवडा निर्माण झाला आहे. म्हणून परिवहन विभागाचे ड्रायव्हर्स ऑक्सिजनचे टँकर आणण्यासाठी उपलब्ध करून देणार आहोत, अशी माहिती अनिल परब यांनी दिली. 

दुसरीकडे कोणाला मागणार?

ऑक्सिजन व रेमडेसिवीर वितरणाचे अधिकार राज्य सरकारला दिले तर, राज्य सरकार केंद्राकडे कशाला परवानगी मागेल. ज्या गोष्टी केंद्र सरकारच्या हाती आहेत, त्याची मागणी केंद्र सरकारकडेच केली जाणार. दुसरीकडे कोणाला मागणार, असा खोचक सवाल परब यांनी यावेळी विचारला. कोरोना परिस्थितीत परिवहन खाते अतिशय तत्परतेने काम करत आहे. दोन- तीन विषय सध्या आम्ही हाताळत आहोत, असेही परब म्हणाले. 

“त्यापेक्षा इथल्या मातीचं ऋण फेडलं, तर बरं होईल”; थोरातांचे पीयुष गोयलांना प्रत्युत्तर 

दरम्यान, पुण्यातील पुरंदर जिल्ह्यात ऑक्सिजन, रेमडेसिवरचा तुटवडा असून लसीकरणही थांबले असल्याचा दावा करत विजय शिवतारे यांनी संताप व्यक्त केला आहे. रेमडेसिवीरच्या तुटवड्यावरुन आपण ठिय्या आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. कोव्हिड सेंटरमध्ये निकृष्ठ दर्जाचे जेवण दिले जात असल्याची तक्रार करत प्रचंड मोठ्या प्रमाणात ब्लॅक मार्केटिंग सुरू असल्याचा दावाही शिवतारे यांनी केला.
 

Read in English

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: anil parab says st will do arrangements for oxygen and create green corridor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.