Anganewadi Bharadi Devi Jatra 2026 Special Trains: दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीची वार्षिक जत्रा ९ फेब्रुवारी २०२६ रोजी होणार आहे. दरवर्षी लाखोंच्या संख्येने भाविक या जत्रेला उपस्थिती दर्शवतात. यावेळी सुमारे दहा लाखांपेक्षा जास्त भाविक यात्रेस उपस्थिती दर्शवतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आंगणेवाडी जत्रेच्या पार्श्वभूमीवर कोकणरेल्वेने विशेष ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
आंगणेवाडीत येणारे लाखो भाविक देवीच्या दर्शनाची आस घेऊन येतात. वस्त्रालंकारांनी सजविलेली देवी ‘याचि देही, याचि डोळा’ पाहून जीवनाचे सार्थक झाल्याचा अनुभव भाविकांना या ठिकाणी येतो. कोणत्याही प्रकारची गैरसोय न होता आई भराडी मातेचे दर्शन होण्यासाठी आंगणे कुटुंबीयांसह आंगणेवाडीचे सर्व सदस्य मेहनत घेत असतात. या यात्रोत्सवामध्ये मोठ्या प्रमाणात मुंबईकर चाकरमानी उपस्थिती दर्शवितात.
कोकण रेल्वेच्या दोन विशेष ट्रेन कधीपासून? पाहा, वेळापत्रक
- कोकण रेल्वेवर ट्रेन क्रमांक ०१००३ लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई ते मडगाव जंक्शन साप्ताहिक विशेष ट्रेन ०८ फेब्रुवारी २०२६ आणि १० फेब्रुवारी २०२६ रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून सकाळी ०७ वाजून ५५ वाजता सुटेल. ही गाडी त्याच दिवशी रात्री १० वाजता मडगाव जंक्शन येथे पोहोचेल.
- ट्रेन क्रमांक ०१००४ मडगाव जंक्शन ते लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई साप्ताहिक विशेष गाडी ०७ फेब्रुवारी २०२६ आणि ०९ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ०४ वाजून ३० वाजता मडगाव जंक्शनवरून सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी पहाटे ५ वाजून ५० मिनिटांनी लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल.
- ही ट्रेन करमाळी, थिविम, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलवडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पेण, पनवेल आणि ठाणे स्थानकांवर थांबतील.
- या ट्रेनला एकूण २२ कोच असतील. यामध्ये २० स्लीपर कोच आणि २ एसएलआर कोच असणार आहेत.
- या ट्रेनचे थांबे आणि वेळापत्रकाची सविस्तर माहिती www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला पाहता येणार आहे. तर, ट्रेन क्रमांक ०१००४ साठीचे तिकीट बुकिंग ०४ फेब्रुवारी २०२६ रोजी सुरू होणार आहे.
दरम्यान, आंगणेवाडीची जत्रा ही कोणत्याही तिथीवर अवलंबून नसते. दरवर्षी डिसेंबर महिन्यात आंगणे कुटुंबीय आणि मानकरी भराडी देवीला 'कौल' लावला जातो. देवीचा हुकूम मिळाल्यावरच यात्रेची तारीख निश्चित केली जाते. ३ डिसेंबर रोजी झालेल्या कौलानुसार, ९ फेब्रुवारी २०२६ ही तारीख ठरवण्यात आली. या दीड दिवसांच्या यात्रेत सहभागी होण्यासाठी लाखो भाविक आवर्जून उपस्थिती दर्शवतात.
Web Summary : Konkan Railway announces special trains for the Anganewadi Jatra on February 9, 2026. Two weekly trains will run between Lokmanya Tilak Terminus and Madgaon. Booking for train number 01004 starts on February 4, 2026. Check timings and stops online.
Web Summary : कोंकण रेलवे ने 9 फरवरी, 2026 को आंगणेवाड़ी जत्रा के लिए विशेष ट्रेनों की घोषणा की। लोकमान्य तिलक टर्मिनस और मडगाँव के बीच दो साप्ताहिक ट्रेनें चलेंगी। ट्रेन नंबर 01004 के लिए बुकिंग 4 फरवरी, 2026 को शुरू होगी। समय और स्टॉप ऑनलाइन देखें।