शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

..अन् ते पाषाण झाले श्रद्धास्थान

By admin | Updated: June 4, 2014 01:14 IST

‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ महामहामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला हा मानव विकासाचा महामंत्र जगविख्यात आहे. परंतु या महामंत्रापूर्वी सुद्धा बाबासाहेबांनी आपल्या अस्पृष्य

दोन महामानवांची ऐतिहासिक भेट : डॉ. आंबेडकरांनी

आपल्या समाजाला दिला पंचसूत्री कार्यक्रम  नागपूर : ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ महामहामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला हा मानव विकासाचा  महामंत्र जगविख्यात आहे. परंतु या महामंत्रापूर्वी सुद्धा बाबासाहेबांनी आपल्या अस्पृष्य समाजाला एक पंचसूत्री कार्यक्रम दिला  होता. एका दगडावर बसून त्यांनी समाजबांधवांना संबोधित करताना ते सूत्र सांगितले होते. सेवाग्राम वर्धा येथील त्या ऐतिहासिक  पाषाणाला आज श्रद्धेचे व पर्यटनाचे स्थान प्राप्त झाले आहे.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नाशिक जिल्ह्यातील येवला येथे १३ ऑक्टोबर १९३५ रोजी ‘मी हिंदू म्हणून जन्मलो तरी हिंदू  म्हणून मरणार नाही’ असे म्हणत धर्मांंंंंतराची घोषणा केली होती. त्या घोषणेनंतर देशभरात खळबळ माजली. या धर्मांंंंतरामुळे काही  विपरीत तर घडणार नाही, अशी तत्कालीन नेत्यांना भीती वाटू लागली. या पार्श्‍वभूमीवर डॉ. आंबेडकरांशी बोलावे, अशी विनंती  तत्कालीन नेत्यांनी महात्मा गांधीजींनी केली. महात्मा गांधी सेवाग्रामच्या आश्रमात थांबले होते. महात्मा गांधीजींचे निकटचे  सहकारी प्रसिद्ध उद्योगपती जमनालाल बजाज यांनी पुढाकार घेऊन १ मे १९३६ रोजी डॉ. आंबेडकर आणि महात्मा गांधी यांची  भेट घडवून आणली. दोन महामानवांची ती ऐतिहासिक भेट होती. त्या भेटीत धर्मांंंंंतराच्या घोषणेसह देशातील इतर अनेक  विषयावंर चर्चा झाली. यावेळी माझ्यामुळे देशाला किंवा देशाच्या संस्कृतीला कुठलाही धक्का लागणार नाही, याबाबत डॉ.  आंबेडकरांनी महात्मा गांधींना आश्‍वस्त केले. त्यानंतर महात्मा गांधींनी या विषयावर कधीच चर्चा केली नाही. त्यानंतरचा  धर्मांंंंंतराचा इतिहास सर्वश्रुत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सेवाग्रामला येणार याची माहिती मिळताच हजारोंच्या संख्येने अस्पृष्य समाज सेवाग्राममध्ये दाखल  झाला होता. महात्मा गांधीजींसोबत तब्बल दीड तास चाललेल्या चर्चेनंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर बापुकुटीतून बाहेर पडले.  तेव्हा बाहेर त्यांची वाट पाहात समाजबांधव उभे होते. समोरच विठ्ठल रुक्मिणीचे एक मंदिर होते. त्यासमोरील एका दगडावर ते  बसले. त्यांनी आपल्या समाजाशी संवाद साधला. तो संवाद केवळ खानापूर्ती नव्हता तर त्यांनी त्या संवादातून आपल्या अस्पृष्य  समाजाला विकासाचा एक पंचसूत्री कार्यक्रम दिला. मेलेल्या जणावरांना ओढणे बंद करा, शिक्षण घ्या, स्वच्छता बाळगा,  महारवतनदारी सोडा आणि मतभेदाचे झाड पोटात वाढू देऊ  नका, असा तो ऐतिहासिक पंचसूत्री कार्यक्रम होता. त्यावेळी या  संवादाचीही खूप चर्चा झाली होती.  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा परिस्पर्श झालेल्या त्या पाषाणाला समाजबांधवांनी जपून ठेवले. आज तो परिसर एक श्रद्धास्थान  बनला आहे. सेवाग्रामला भेट देणारे पर्यटक या ठिकाणी आवर्जून भेट देत असतात. (प्रतिनिधी)