शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
2
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
3
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
4
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
5
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
6
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
7
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
8
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
9
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
10
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
11
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
12
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
13
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
14
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
15
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
16
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
17
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
18
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
19
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
20
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
Daily Top 2Weekly Top 5

अन् २५ वर्षांपूर्वीच्या आठवणीने पुन्हा उडाला थरकाप!

By admin | Updated: July 31, 2014 11:02 IST

माळीण या गावात ४० घरांवर दरड कोसळल्याची बातमी ऐकली आणि मावळ तालुक्यातील मळवलीनजीकच्या भाजे गावातील २५ वर्षांपूर्वीच्या भीषण घटनेच्या आठवणीने ग्रामस्थांचा पुन्हा एकदा थरकाप उडाला.

३७ जणांचा झाला होता मृत्यू : मावळ तालुक्यातील भाजे गावात कोसळली होती दरडभाऊ हुलावळे ल्ल कार्ला (ता. मावळ)आंबेगाव तालुक्यातील माळीण या गावात ४० घरांवर दरड कोसळल्याची बातमी ऐकली आणि मावळ तालुक्यातील मळवलीनजीकच्या भाजे गावातील २५ वर्षांपूर्वीच्या भीषण घटनेच्या आठवणीने ग्रामस्थांचा पुन्हा एकदा थरकाप उडाला.मळवली रेल्वे स्थानकापासून हाकेच्या अंतरावरील छोट्या, पण निसर्गरम्य भाजे गावाचे पर्यटन नकाशावर बुद्ध लेण्यांमुळे ठळक स्थान आहे. याच गावात २३ जुलै १९८९ रोजी असाच निर्सगाचा कोप झाला होता. लेणीच्या अलीकडे असलेल्या टुमदार भाजे गावात झालेल्या जोरदार पावसामुळे सकाळी पावणेसातच्या सुमारास टेकडीचा भाग खचला आणि दगडमातीच्या लोंढ्याने लगतची अनेक घरे आपल्या उदरात घेतली. त्यातील एकूण ३७ जण यात मृत्युमुखी पडले. राऊत कुटुंबातील तब्बल २६ माणसे एकाच वेळी काळाने हिरावून नेली. टेकडीपासून दूर असलेली गावातील इतर घरे बचावलीया घटनेत बचावलेले राऊत कुटुंबातील संदीप राऊत यांना मुसळधार पावसातील घडलेले मृत्यूचे तांडव आठवताना अश्रू आवरत नव्हते. त्या वेळी ते नुकतीच बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाले होते. ते म्हणाले, ‘‘आमचे कुटुंबच उद्ध्वस्त झाले. माझे आई-वडील, भाऊ, तीन चुलत भाऊ, त्यांची बायका-मुले, चुलते, चुलती, दोन चुलत बहिणी, त्यांची मुले अशी २६ माणसे एकाच वेळी मातीत गाडली गेली. मला एका व्यक्तीने आवाज दिल्याने सुदैवाने वाचलो. एक चुलतभाऊ कामानिमित्त बाहेर गेला होता. तोही वाचला. मी वाचलो, पण पुढे काय झाले हे फारसे आठवत नाही.या घटनेचे साक्षीदार माजी सरपंच नंदू पदमुले यांनी सांगितले, की राऊत, टकले, खाटपे, बारमुख या कुटुंबावर त्या दिवशी काळाने घाला घातला. त्या घरांतील कामानिमित्त बाहेर गेलेलेच बचावले. अनेक जनावरेही ढिगाऱ्याखाली गाडली गेली. ही घटना घडण्याच्या आदल्या रात्रीपासून धोधो पाऊस सुरू होता. सकाळीच घटना घडल्याने आम्ही सुन्न झालो. कान्हे येथील मोरी वाहून गेल्याने रेल्वे सेवा विस्कळीत झाली होती. दूरध्वनी यंत्रणा बंद होती. मी स्वत: भाजे ते लोणावळा असा चालत जाऊन लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यास दुर्घटनेची खबर दिली. त्या नंतर प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली. सुदैवाने कार्ल्याजवळ इंद्रायणी नदीवरील नवीन पुलाचे काम पूर्ण होऊन तो वाहतुकीस खुला झाला होता. त्यामुळे ढिगारा बाजूला करण्यासाठीची यंत्रसामग्री घटनास्थळी नेता आली. मदतकार्य कित्येक दिवस सुरू होते. त्या वेळेच्या आठवणींनी आजही थरकाप उडतो.> भाजे लेणीकडे जाणारा रस्ता त्या वेळी पूर्णपणे ढिगाऱ्याखाली गेला होता. तत्कालीन महसूल राज्यमंत्री मदन बाफना तालुक्यातीलच असल्याने शासकीय यंत्रणा वेगाने हलत होती. आपद्ग्रस्त १०५ कुटुंबांचे पुनर्वसन प्रत्येकी दीड गुंठा जागा देऊन गावानजीकच्याच सुरक्षित जागेवर करण्यात आले. मृत व्यक्तींच्या वारसांना १५ हजार रुपये देण्यात आले.