शहरं
Join us  
Trending Stories
1
नीट पेपरफुटीचा भंडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
2
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
3
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
4
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
5
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
6
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
7
मोटेगावकर पेपरफुटीविरोधात लढत होता, आता स्वतःच आरोपी बनला...
8
"असे १०० जाळून टाकेन...", हॉस्पिटलबाहेर फोटो काढणाऱ्या पापाराझींवर भडकला सलमान खान, दिला थेट इशारा
9
संपादकीय: बांधावर घोंगावणारे वादळ, वेळीच नाही ओळखले तर...
10
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
11
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
12
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
13
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
14
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
15
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
16
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
17
‘ईपीएफ’चे पैसे ‘यूपीआय’द्वारे काढता येणार; तांत्रिक चाचणी यशस्वी
18
शिंदेसेनेच्या नगरसेवकांना १५४ कोटी; भाजपच्या वाट्याला केवळ ३ कोटी
19
नालेसफाईच्या ठेक्यात १५ टक्के लाचेची मागणी; एपीएमसी उपसचिव अडकला एसीबीच्या जाळ्यात
20
महाविद्यालयात किती रिक्त जागा; आज कळणार , अकरावी प्रवेश प्रक्रियेचा पुढील टप्पा २१ मेपासून 
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील आठ लाखांवर शिधापत्रिकांबाबत संदिग्धता! पाच महिन्यांपासून धान्याची उचल नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2021 03:01 IST

क्षेत्रीय स्तरावर तपासणी, या तपासणीअंती या शिधापत्रिकांबाबत योग्य तो निर्णय घेण्यात येईल

अनिल गवई

बुलडाणा : पाच महिन्यांपेक्षा अधिक कालावधीपासून धान्याची उचल न झालेल्या तब्बल ७.९० लक्ष शिधापत्रिका शासनाच्या रडारवर आहेत. क्षेत्रीय स्तरावर तपासणी होईपर्यंत या शिधापत्रिका धान्य उचलण्यासाठी अपात्र ठरविण्यात येणार आहेत.

राज्यात संगणकीकृत केलेल्या शिधापत्रिकांवरील लाभार्थींनी ऑगस्ट २०२० ते डिसेंबर २०२० या पाच महिन्यांच्या कालावधीत धान्याची उचल केलेली नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे राज्यातील ७ लक्ष ९५ हजार १६८ शिधापत्रिकांची क्षेत्रीय स्तरावर तपासणी करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. 

या तपासणीअंती या शिधापत्रिकांबाबत योग्य तो निर्णय घेण्यात येईल. या शिधापत्रिका संबंधित शिधा वाटप निरीक्षकांच्या लॉगिनमध्ये वळत्या केल्या जातील. त्यानंतर अपात्र, बोगस, अनिच्छुक अशी शिधापत्रिकांची वर्गवारी केली जाईल.पश्चिम विदर्भातील अकोला, वाशिम आणि बुलडाणा जिल्ह्यातील ३९ हजार २२७ हजार शिधापत्रिकाधारकांनी धान्याची उचल केलेली नाही.यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील १८ हजार १४३, अकोला जिल्ह्यातील १५ हजार ५०१ तर वाशिम जिल्ह्यातील ५ हजार ५८३ शिधापत्रिकांचा समावेश आहे.

ई-पॉसबाबत साशंकता!
n राज्यातील स्वस्त धान्य दुकानदारांना देण्यात आलेल्या ई-पॉस मशीनमध्ये अनेकदा तांत्रिक अडचण निर्माण होते. लाभार्थींचे ‘थंब’ लागत नाहीत. २-जी नेटवर्कमुळे खोळंबा होतो. त्यामुळे आधार लिंकिंग असतानाही लाभार्थी धान्यापासून वंचित राहतात. त्यामुळे या क्षेत्रीय स्तरावरील तपासणीबाबत नाराजीचा सूर आहे.

मुंबई, ठाणे टॉपवर
मुंबई आणि लगतच्या जिल्ह्यातील सर्वाधिक शिधापत्रिकाधारकांनी धान्याची उचल केलेली नाही. यामध्ये ठाणे १,१५,९०४, वडाळा ८७,१८२, पालघर ४२,००४, तर नाशिक जिल्ह्यातील ३६,८३७ शिधापत्रिकाधारकांनी गत पाच महिन्यांत धान्याची उचल केलेली नाही.