Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 10:51 IST2025-11-08T10:50:58+5:302025-11-08T10:51:22+5:30
Ambadas Danve And Ajit Pawar : ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी अजित पवारांना खोचक टोला लगावला आहे.

Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी "मी आधीच सांगितलं आहे की, मला या व्यवहाराबद्दल माहिती नव्हतं. याची चर्चा सुरू झाल्यानंतर मी मुख्यमंत्र्यांना कॉल केला होता. त्यांना सांगितलं की, तुम्ही राज्याचे प्रमुख म्हणून तुम्हाला चौकशी करायची असेल, समिती नेमायची असेल, त्या सगळ्या गोष्टींना माझा पाठिंबा आहे" असं म्हणत जमीन व्यवहार रद्द करण्यात आल्याची माहिती दिली. या प्रकरणात एका पैशाचाही व्यवहार झालेला नव्हता, असा खुलासाही त्यांनी केला.
ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी यावरून आता अजित पवारांना खोचक टोला लगावला आहे. "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’, डबल इंजिनकी सरकार... भ्रष्टाचार करेंगे धुवांधार... असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे. दानवे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्वीट केलं आहे. तसेच कोरेगावपार्क, जमीनविक्री, महाराष्ट्र हे हॅशटॅग देखील वापरले आहेत.
अजित पवार म्हणतात की व्यवहार झालाच नाही. असं असेल तर मग तो रद्द करण्याची वेळ कशी आली.. अजित दादांचे या विषयाचे वक्तव्य म्हणजे
— Ambadas Danve (@iambadasdanve) November 8, 2025
'जोक ऑफ द डे' आहेत...
इतर वेळी मुद्देसूद विषय मांडणारे, नियमांवर बोट ठेवणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ही 'बेसंबंध' वाक्य सहनही होतात. एका…
"डबल इंजिनकी सरकार... भ्रष्टाचार करेंगे धुवांधार..."
"अजित पवार म्हणतात की व्यवहार झालाच नाही. असं असेल तर मग तो रद्द करण्याची वेळ कशी आली.. अजित दादांचे या विषयाचे वक्तव्य म्हणजे 'जोक ऑफ द डे' आहेत... इतर वेळी मुद्देसूद विषय मांडणारे, नियमांवर बोट ठेवणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ही 'बेसंबंध' वाक्य सहनही होतात. एका अर्थाने संघाच्या मुशीत तयार झालेल्या नेत्याने भ्रष्टाचाराला दिलेला हा राजश्रय म्हणावा लागेल... डबल इंजिनकी सरकार... भ्रष्टाचार करेंगे धुवांधार..." असं म्हणत अंबादास दानवे यांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे.
"वोटचोरीनंतर 'खतचोरी', भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खातंय"; अंबादास दानवेंचा घणाघात
अंबादास दानवे यांनी खतचोरी झाल्याचं म्हणत भाजपावर गंभीर आरोप केला आहे. "भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खात आहे. पावसाच्या अस्मानीने लुटल्या गेलेल्या शेतकरी बांधवाना आता भाजपाचे लोक अशा 'सुलतानी' पद्धतीने लुटताहेत. मेवाभाऊंची खंबीर साथ... बोगस धंद्यात घालू हात..." असं म्हणत जोरदार हल्लाबोल केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून काही व्हिडीओ देखील शेअर केले आहेत.