शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
3
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
4
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
5
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
6
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
7
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
8
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
9
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
10
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
11
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
12
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
13
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
14
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
15
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
16
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
17
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
18
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
19
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
20
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
Daily Top 2Weekly Top 5

इमॅजिकाला करमणूक करात सुट?

By admin | Updated: June 12, 2015 10:13 IST

खालापूर तालुक्यातील अ‍ॅडलॅब एन्टरटेंन्मेट प्रा. लि. कंपनीला (इमॅजिका) सरकारने करमणूक करात १५ टक्क्यांची सुट दिली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला

आविष्कार देसाई, अलिबागखालापूर तालुक्यातील अ‍ॅडलॅब एन्टरटेंन्मेट प्रा. लि. कंपनीला (इमॅजिका) सरकारने करमणूक करात १५ टक्क्यांची सुट दिली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला पुढील दहा वर्षांत सुमारे ३६० कोटी रुपयांच्या महसुलावर पाणी सोडावे लागणार आहे. एकट्या रायगडमध्ये महसुलात एवढ्या मोठ्या प्रमाणावर भुर्दंड पडणार असेल तर, महाराष्ट्रभर हाच आकडा किती असेल, याची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. करमणूक कर म्हणून सरकार १५ टक्के प्रत्येक तिकिटावर आकारते. त्यानुसार ५ जून २०१३ रोजी इमॅजिकाने करमणूक करापोटी एक कोटी ५० लाख ५९ हजार रुपये जिल्हा प्रशासनाकडे भरले होते.राज्यातील पर्यटन उद्योगाला गती देण्यासाठी पर्यटन धोरण २००६ नुसार पात्र असणाऱ्या पर्यटन उमक्रमांना करमणूक शुल्क अधिनियम १९२३ कलम ३ मधील तरतुदीप्रमाणे करमणूक करात सुट देण्याचा निर्णय सरकारने २३ आॅक्टोबर २०१२ रोजी जाहीर केला आहे.पर्यटन धोरणाचा आधार घेत इमॅजिकाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या करमणूक कर विभागाकडे करमणूक करात सुट देण्यात यावी, असा प्रस्ताव सादर केला आहे. त्यानुसार १५ जून २०१३ ते १४ जून २०२३ या दहा वर्षांच्या कालावधीसाठी कंपनीला या करातून सुट दिली आहे. त्याचप्रमाणे वॉटर पार्कसाठीही करमणूक करातून सुट मिळावी यासाठी सप्टेंबर २०१४ साली कंपनीने जिल्हा प्रशासनाकडे प्रस्ताव सादर केला आहे. त्यात १ जून २०१५ ते २१ मे २०२५ पर्यंत सुट मिळावी, अशी मागणी कंपनीने केली आहे. दरम्यान, सरकारच्या निर्णयानुसारच करमूणक करात सवलत दिली आहे. महसूल बुडतो ही वस्तुस्थिती असली, तरी तो सरकारचा निर्णय असल्याचे सूत्रांनी सांगितले. तिकिटाच्या किमतीतून करमणूक कर वगळला आहे का, याची तपासणी खालापूर तहसीलदारांनी करावी, असे पत्र पाठविले असल्याचे करमणूक विभागाने सांगितले.