शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

मायलेकीसह चौघांचा बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2016 18:41 IST

अकोले तालुक्यातील सातेवाडी (जांभळेवाडी) येथे बंधाऱ्यात धुणे धुण्यासाठी गेलेल्या मायलेकीसह चौघांचा बुडून मृत्यू झाला. मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली.

ऑनलाइन लोकमतकोतूळ, दि. 11 -  अकोले तालुक्यातील सातेवाडी (जांभळेवाडी) येथे बंधाऱ्यात धुणे धुण्यासाठी गेलेल्या मायलेकीसह चौघांचा बुडून मृत्यू झाला. मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. त्यामुळे ऐन दसऱ्याच्या दिवशीच सातेवाडीवर शोककळा पसरली आहे.कोतूळपासून अठरा किलोमीटर अंतरावर सातेवाडी असून, हा सर्व डोंगराळ, आदिवासी भाग आहे. येथील सुनंंदा सुनील मुठे (वय ३०) या मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास गावाजवळीलच नागकापी सिमेंट बंधाऱ्यावर धुणे धुण्यासाठी गेल्या होत्या. त्यांच्यासमवेत त्यांची मुलगी ज्योती (वय ९), भाची दीपाली यमा गभाले (वय १०), तर पुत्नी अस्मिता दुंदा मुठे (वय १२) अशा तिघी मुली गेल्या होत्या. सुनंदा या धुणे धुण्यात व्यस्त असतानाच ज्योती व दीपाली बंधाऱ्याच्या काठावर पाण्यात पोहत होत्या. परंतु काही वेळाने या दोघीही पाण्यात ओढल्या गेल्याने बुडू लागल्या. हे पाहून दीपालीची आई सुनंदा व अस्मिता या दोघीही पाण्यात उतरल्या. परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने त्याही बुडाल्या. पोहता येत नसल्याचे चौैघांचाही मृत्यू झाला. तब्बल तासाभराने आजूबाजूच्या काही लोकांच्या लक्षात ही बाब आली. त्यामुळे बंधाऱ्यावर लोकांनी गर्दी केली. पोलिसांनाही पाचारण करण्यात आले. गावकऱ्यांनी चौघींचेही मृतदेह पाण्याबाहेर काढले. रात्री उशिरापर्यंत पंचनामा करण्याचे काम सुरू होते. सुनंदा यांच्यामागे पती सुनील, तसेच सासू-सासरे असा परिवार आहे. सुनंदा यांची भाची दीपाली ही त्यांच्याकडे शाळेला होती. दोन दिवसांपूर्वीच अपघाताची घटना दोन दिवसांपूर्वी सातेवाडी येथीलच टेम्पो दरीत कोसळून दोन ठार, तर २१ जण जखमी झाले होते. ही घटना ताजी असतानाच आज पुन्हा चौघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडल्याने सातेवाडीवर शोककळा पसरली आहे.