शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: मुख्यमंत्री 'बुलेट'वरून विधानभवनात! PM मोदींचा आदर्श ठेवत फडणवीसांचाही कृतीतून संदेश
2
Top Marathi News Live Updates: ४० प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या खाजगी बसला टीपर लॉरीची धडक, एक ठार
3
Russian Oil Imports: भारताची धाकधूक वाढली! रशियन तेलावरील अमेरिकन सवलत १६ मे रोजी संपणार; रिफायनरीजसमोर पेच
4
Kerala CM Selection Update : केरळचा नवा मुख्यमंत्री कोण? नावावर अखेर शिक्कामोर्तब; दिल्लीत हालचालींना वेग
5
ह्रदयद्रावक! नातीचा मृतदेह मांडीवर ठेवून आजोबांनी काढली रात्र; चाळीसगावमधील संतापजनक घटना
6
Adhik Maas 2026: अधिक मासात संकटमुक्तीसाठी करा 'ही' दत्तसेवा; मिळेल श्री दत्तगुरूंचा अखंड आशीर्वाद!
7
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातविरुद्ध दोषारोपपत्र; ४९ दिवसांपासून कोठडीत; १०५ साक्षीदारांकडे चौकशी
8
Sambit Patra : "२२ वर्षांत ५४ परदेश दौरे, राहुल गांधींच्या ट्रिपचा खर्च ६० कोटी"; कमाईवरुन भाजपाचा खोचक सवाल
9
Harish Rana : मृत्यूनंतरही हरीश राणा ठरले 'हिरो'; कुटुंबाच्या एका निर्णयाने कोर्टाचेही डोळे पाणावले!
10
Dollar vs Rupee : रुपया २० पैशांनी घसरुन विक्रमी नीचांकी स्तरावर; डॉलरच्या तुलनेत ९६ च्या जवळ पोहोचला
11
Virat Kohli Record : किंग कोहलीचा ‘विराट’ अवतार! एका डावात ५ विक्रमांची नोंद
12
Cannes 2026: मराठमोळ्या अभिनेत्याने मान गर्वाने उंचावली! झळकला कान्सच्या रेड कार्पेटवर, म्हणाला...
13
घटस्फोटाच्या केस दरम्यान पतीने केलं किळसवाणं कृत्य; पत्नीने पोलिसांना आपबिती ऐकवताच सगळे हादरले
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर धडाम! कालच्या तेजीनंतर आज किमतीत घसरण, पाहा लेटेस्ट रेट
15
Neet Exam Case: कन्सल्टन्सीच्या नावे शोधायचा सावज, शुभमने केले होते स्वत:चे ‘नीट’ ब्रॅण्डिंग
16
नीट पेपरफुटीचे पुणे कनेक्शन, तरुणीसह तिघांना घेतले ताब्यात; शुभमच्या चौकशीतून लोखंडेचे नाव समोर 
17
Video - सेल्स गर्लचा १.६६ कोटींवर डल्ला! सोन्याच्या दागिन्यांनी भरले खिसे, मालकाला घातला गंडा
18
या देशात पेट्रोल-डिझेलचा एकही थेंब उरला नाही; सरकारने केली 'ब्लॅकआउट'ची घोषणा
19
"लोकांना माझं बोलणं आवडत नाही, पण..." जिनपिंग यांची स्तुती करताना ट्रम्प यांनी विरोधकांना असं झापलं!
20
शनी जयंती २०२६: कर्माचा हिशोब अन् धनाची आवक; 'या' राशींसाठी १६ मे ठरणार गेम-चेंजर!
Daily Top 2Weekly Top 5

सर्व शिक्षा अभियान प्रतिनियुक्ती रद्द प्रकरण

By admin | Updated: June 16, 2014 20:11 IST

सर्व शिक्षा अभियान अंतर्गत प्रतिनियुक्तीवर असलेल्या शिक्षकांना आरटीई कायद्यानुसार त्यांच्या मूळ नियुक्तीच्या ठिकाणी परत पाठविण्याचा निर्णय जिल्हा परिषद प्रशासनाने घेतला आहे.

अकोला : सर्व शिक्षा अभियान अंतर्गत प्रतिनियुक्तीवर असलेल्या शिक्षकांना आरटीई कायद्यानुसार त्यांच्या मूळ नियुक्तीच्या ठिकाणी परत पाठविण्याचा निर्णय जिल्हा परिषद प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठी काढण्यात आलेल्या आदेशावर न्यायालयात दाखल याचिकेचा संदर्भ देण्यात आला आहे. मुळात या याचिकेवर न्यायालयाने कोणताही निर्णयच दिला नसल्याने निर्णयाचा संदर्भ देऊन काढण्यात आलेल्या आदेशामुळे अधिकारी अडचणीत सापडले आहेत.
सर्व शिक्षा अभियान अंतर्गत जिल्‘ातील शिक्षकांना जिल्हा समन्वयक, गट समन्वयक आणि विषय तज्ज्ञ म्हणून प्रतिनियुक्ती देण्यात आली होती. आरटीई कायद्यानुसार या शिक्षकांना पदमुक्त करण्याचे आदेश शासनाने दिले होते. या आदेशाला ५ ऑगस्ट २0१३ रोजी उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. याचिका क्रमांक डब्ल्यू पी /७0९0/२0१३ असून या याचिकेवर २0 फेब्रुवारी २0१४ रोजी सुनावणी झाली. पुढील सुनावणी ९ जुलै २0१४ रोजी आहे. अद्याप न्यायालयाने या याचिकेवर कोणताही निर्णय दिलेला नाही. असे असताना अकोला जिल्हा परिषद शिक्षण विभागाने २३ शिक्षकांच्या प्रतिनियुक्त्या रद्द करण्यासाठी ११ जून २0१४ रोजी काढलेल्या आदेशात डब्ल्यू पी /७0९0/२0१३ या क्रमांकाच्या याचिकेच्या निर्णयानुसार संदर्भ देऊन प्रतिनियुक्ती रद्द करण्यात येत असल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे आदेश काढणारे शिक्षणाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी हे दोन्ही अडचणीत सापडले आहेत.


** दोन कर्मचारी एकाच पदावरून दोन वेळा कार्यमुक्त
सर्व शिक्षा अभियान अंतर्गत गट समन्वयक म्हणून कार्यरत असलेल्या दोन शिक्षकांना एकाच पदावरून दोन वेळा कार्यमुक्त करण्याचा प्रताप जिल्हा परिषद प्रशासनाने केला आहे. शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी २५ एप्रिल २0१४ रोजी पातूरचे गट समन्वयक किशोर निलखन आणि आकोटचे गट समन्वयक उमेश चोरे यांना कार्यमुक्त करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार हे शिक्षक कार्यमुक्त झालेत. त्यानंतर ११ जून रोजी पुन्हा या दोन्ही शिक्षकांना कार्यमुक्त करण्याचे आदेश शिक्षणाधिकार्‍यांनी काढले आहेत.