अकोला वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक निलंबित, लिपिकाची बदली

By Admin | Updated: July 18, 2014 00:44 IST2014-07-17T23:11:48+5:302014-07-18T00:44:20+5:30

वैद्यकीय मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा दणका !

Akola Medical College student suspended, suspended for scripts | अकोला वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक निलंबित, लिपिकाची बदली

अकोला वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक निलंबित, लिपिकाची बदली

अकोला : अकोला वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांंनी त्यांना दैनंदिन जीवनात तसेच शिक्षण घेताना येत असलेल्या समस्यांचा पाढा वैद्यकीय शिक्षण तथा फलोत्पादन मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यापुढे वाचला. विद्याथ्यार्ंच्या समस्यांची दखल घेत डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी दबंगगिरी दाखवत तत्काळ प्रा. डॉ. एस.एन.के. हुसैनी यांना निलंबित तर लिपिक बेंडेकर यांची तडकाफडकी बदली करण्यात येत असल्याची घोषणा केली.
येथील वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांंशी वैद्यकीय शिक्षण तथा फलोत्पादन मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ह्यकॉफी विथ स्टुडन्टह्ण या उपक्रमांतर्गत वैद्यकीय महाविद्यालयात दुपारी ३ वाजता संवाद साधला. विद्यार्थ्यांंच्या समस्या जाणून घेतल्यानंतर आव्हाड यांनी वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. अशोक राठोड व बांधकाम अभियंता विजय भाले, सुंदरदास भगत यांना समस्या लवकर सोडविण्याचे आदेश दिले. विद्यार्थी व विद्यार्थिनींनी त्यांना काही प्राध्यापक अश्लील भाषेत शिवीगाळ करीत असून, त्रास देत असल्याची तक्रार केली. या गंभीर प्रकाराची दखल घेत जितेंद्र आव्हाड यांनी तक्रार करणार्‍या विद्यार्थ्यांंना बोलावून संबंधित प्राध्यापकाचे नाव विचारले. विद्यार्थ्यांंनी प्रा.एस.एन.के. हुसैनी यांचे नाव सांगताच त्यांना निलंबित करण्यात आल्याची घोषणा केली. तसेच लिपिक बेंडेकर हे विविध कामांसाठी पैसे मागतात व स्वत:ला डीन समजतात, अशी जाहीर तक्रार विद्यार्थ्यांंनी केली. त्यामुळे त्यांची तत्काळ बदली करण्यात आली.

Web Title: Akola Medical College student suspended, suspended for scripts