शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
5
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
6
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
7
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
8
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
9
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
10
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
11
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
12
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
13
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
14
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
15
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
16
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
17
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
18
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
19
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
20
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

अकोला विमानतळ विस्तारीकरणाचा मार्ग मोकळा

By admin | Updated: December 24, 2014 00:42 IST

कोणत्याही विभागाचा विकास करण्यासाठी त्या भागातील दळणवळणाची साधने सक्षम असणे आवश्यक असते. त्यामुळे अकोला विमानतळ विस्तारीकरणात येत असलेले सर्व अडथळे दूर करून

अडथळे दूर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन : जिल्ह्यातील आमदारांची लक्षवेधी नागपूर : कोणत्याही विभागाचा विकास करण्यासाठी त्या भागातील दळणवळणाची साधने सक्षम असणे आवश्यक असते. त्यामुळे अकोला विमानतळ विस्तारीकरणात येत असलेले सर्व अडथळे दूर करून विमानतळाच्या विस्तारीकरणाच्या कामाला लवकरच सुरुवात करू, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत दिले. अकोला जिल्ह्यातील आमदारांनी लक्षवेधीद्वारे विमानतळाच्या विस्तारीकरणाची मागणी केली, त्यावर मुख्यमंत्र्यांनी शासन विमानतळाच्या विस्तारीकरणाबाबत सकारात्मक भूमिकेत असल्याचे सांगितले. अकोला विमानतळाच्या विस्ताराची मागणी गत दहा वर्षांपासून करण्यात येत आहे. पश्चिम विदर्भातील अकोला हे महत्त्वाचे शहर असून, संतनगरी शेगाव येथे दरवर्षी लाखो भाविक येतात. तसेच नरनाळा किल्ला व चिखलदरा येथून जवळ असल्यामुळे पर्यटकही येत असल्याने विमानतळाचा विस्तार आवश्यक आहे. मात्र, विस्तारीकरणासाठी जागा देण्यात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने जागा देण्यास नकार देऊन खोडा घातला आहे. त्यामुळे या विमानतळाचा विस्तार करण्यातील अडचणी दूर करण्याची मागणी अकोला पूर्वचे आ. रणधीर सावरकर यांनी केली. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी अकोला विमानतळाचे विस्तारीकरण अत्यंत गरजेचे असून, शासनाची त्याबाबत भूमिका सकारात्मक आहे. मात्र, विमानतळ विस्तारीकरणाबाबत एका प्रकरणात उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. ही स्थगिती उठविण्यासाठी उच्च न्यायालयात शासन सक्षम बाजू मांडणार असल्याचे सांगितले. त्यानंतर आ. गोवर्धन शर्मा यांनी अकोल्याच्या विमानतळ विस्तारीकरणासाठी ५ कोटी ६४ लाख रुपयांचा निधी आला आहे. मात्र, अधिकाऱ्यांच्या नकारात्मक भूमिकेमुळे विस्तार रखडला आहे. अधिकाऱ्यांनी घातलेला खोडा दूर करणार काय? असा प्रश्न विचारल्यावर मुख्यमंत्र्यांनी उच्च न्यायालयाची स्थगिती उठल्याबरोबर विस्तारीकरणाच्या कामाला सुरुवात करू, असे सांगितले. यावेळी आ. हरीश पिंपळे यांनीही अकोल्याच्या विकासाकरिता विमानतळ आवश्यक असून, यामध्ये डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू अडथळा आणत असल्याचे सांगितले. तसेच अचलपूरचे आ. बच्चू कडू यांनी या विमानतळावर तत्काळ विमानसेवा सुरू का करण्यात येत नाही, असा प्रश्न विचारला. त्यावर मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी धावपट्टी छोटी असल्यामुळे विमान उतरविता येत नाही. विस्तारीकरणानंतर विमानसेवा सुरू करू, असे सांगितले. जळगाव जामोदचे आमदार संजय कुटे यांनीही विमानतळावरून अमरावती विमानतळाप्रमाणेच दिवस-रात्र विमानसेवा सुरू करण्याची मागणी केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी विमानतळ विस्तारीकरणानंतर तशी सेवा सुरू करू, असे आश्वासन दिले.विधानसभेतील सदस्य सर्वश्री रणधीर सावरकर, गोवर्धन शर्मा, हरीश पिंपळे यांनी लक्षवेधी मांडली होती. (प्रतिनिधी)