जितेंद्र आव्हाडांविरोधात अजित पवार उमेदवार देणार; राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढणार, मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2024 05:16 PM2024-06-25T17:16:57+5:302024-06-25T17:17:19+5:30

Ajit Pawar NCP Vs Jitendra Awhad: कळवा-मुंब्रा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढविणार असल्याची घोषणा राष्ट्रवादीचे नेते आनंद परांजपे आणि नजीब मुल्ला यांनी केली आहे.

Ajit Pawar will field a candidate against Jitendra Awhad; Will fight on NCP symbol in Kalwa - Mumbra Constir, big announcement | जितेंद्र आव्हाडांविरोधात अजित पवार उमेदवार देणार; राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढणार, मोठी घोषणा

जितेंद्र आव्हाडांविरोधात अजित पवार उमेदवार देणार; राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढणार, मोठी घोषणा

अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडल्यानंतर शरद पवार गटाचे मोजके नेतेच अजित पवारांविरोधात उघड भुमिका घेत होते. यापैकीच एक असलेले मुंब्रा-कळवा मतदारसंघाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजितपवारांना जोरदार टशन दिली होती. आता अजित पवार आव्हाडांचा किल्ला उध्वस्त करण्याची तयारी करत आहेत. 

कळवा-मुंब्रा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढविणार असल्याची घोषणा राष्ट्रवादीचे नेते आनंद परांजपे आणि नजीब मुल्ला यांनी केली आहे. अंगारकी म्हणून आज परमेश्वराचे आणि अल्लाचे आशीर्वाद घेऊन या कळवा-मुंब्रा विधान सभा लढवण्याचे रणशिंग फुंकले आहे. या भागात आम्ही लोकांसाठी कामे करणार आहोत, असे परांजपे म्हणाले. 

येणाऱ्या काळात घड्याळ चिन्हावर उमेदवार निवडून येणार, हा आमचा ठाम विश्वास आहे. येणाऱ्या काळात पोल खोल करणार आहोत. या विधान सभा क्षेत्रात आम्ही डंके की चोट पे काम करणार आहोत असे आव्हान परांजपे यांनी आव्हाडांना दिले आहे. 

कळवा-मुंब्रा या परिसरात शासना मार्फत सरकारने विशेष लक्ष घातले आहे. पहिल्या टप्प्यात 50 कोटी निधी उपलब्ध करून दिला आहे. विकासाच्या नावावरती बराच निधी आलेला आहे, मात्र किती कामे झाली असा सवाल करत मुल्ला यांनी खऱ्या विकासाला महायुतीच्या माध्यमातून सुरुवात झाली आहे, असे सांगितले. 

पहिली कामे ठेकेदार मार्फत होत असत. नागरिकांच्या गरजेपोटी हा विशेष निधी दिला आहे. विकासकामे किती अपूर्ण आहेत आणि किती पूर्ण केली आहेत याची प्रत्येक कामाची लिस्ट देणार आहोत. अल्पसंख्याक निधी देखील येणार आहे. महायुती सरकारच्यामार्फत अजून काही टप्प्यांत निधी येणार आहे. कळवा-मुंब्रा विधानसभा मागील वर्षांपासून घड्याळ चिन्हावरच लढवली जात आहे यावेळी पण घड्याळ चिन्हावरच लढवली जाईल असे ते म्हणाले. 
 

Web Title: Ajit Pawar will field a candidate against Jitendra Awhad; Will fight on NCP symbol in Kalwa - Mumbra Constir, big announcement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.