Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2025 18:34 IST2025-09-08T18:32:43+5:302025-09-08T18:34:27+5:30
Anjali Krishna, Ajit Pawar Clash: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महिला पोलीस अधिकाऱ्याला खडसावल्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता. अवैध उत्खननाविरोधात कारवाई करायला गेलेल्या पोलीस अधिकाऱ्याला कारवाई थांबवण्याचे आदेश अजित पवारांनी दिले होते.

Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
माढ्यातील कुर्डू येथील अवैध उत्खनन प्रकरण ताजे असताना आता गावकऱ्यांकडून कारवाईसाठी गेलेल्या महसूल अधिकाऱ्यांना मारहाण करण्यात आली आहे. याचा व्हिडीओ व्हायरल झाला असून काही गावकऱ्यांच्या हातात उगारलेल्या बेसबॉल स्टीक दिसत आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महिला पोलीस अधिकाऱ्याला खडसावल्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता. अवैध उत्खननाविरोधात कारवाई करायला गेलेल्या पोलीस अधिकाऱ्याला कारवाई थांबवण्याचे आदेश अजित पवारांनी दिले होते. कारवाईस्थळी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माढा तालुका युवकचे अध्यक्ष बाबाराजे जगताप यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन लावून प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी अंजली कृष्णा यांच्या हातात फोन दिला होता.
अंजली कृष्णांनंतर कारवाई गेलेल्या महसूल अधिकाऱ्यांना मारहाण... माढ्यातील कुर्ड गावात प्रकार... #Madha#AjitPawar#NCP#AnjaliKrishna#Solapur#Maharashtrapic.twitter.com/jKTm7sU0oR
— Lokmat (@lokmat) September 8, 2025
आता याच बाबाराजेवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना मारहाण करण्यात आली आहे. अवैध मुरूम उत्खनन प्रकरणी कारवाईसाठी गेलेल्या महसूल कर्मचाऱ्याला गावातील गुंडांनी मारहाण केली आहे. पोलिसांनी व काही गावकऱ्यांनी या अधिकाऱ्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला आहे. तरीही काही गुंड या अधिकाऱ्यांना बेसबॉल स्टीकने मारण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. या बाबाराजे जगतापचा अमली पदार्थांची नशा सेवन करताना व्हिडिओ व्हायरल झाला आहे.