Ajit Pawar Supporter Death: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर गुरुवारी दुपारी १२ वाजून ८ मिनिटांनी बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पार्थ व जय पवार यांनी मुखाग्नी दिला. ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार सुनेत्रा पवार, खा. सुप्रिया पवार यांच्यासह संपूर्ण पवार कुटुंबियांना अश्रू अनावर झाले. लाखो कार्यकर्ते आणि बारामतीकरांनी अश्रू ढाळत लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप दिला. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह देशभरातील विविध नेते आणि मंत्रिमंडळातील सहकारी खासदार, आमदारांसह मान्यवरांनी अंत्यदर्शन घेतले. परंतु, यातच अजित पवार गेले ही बातमी सहन न झाल्यामुळे एका ६३ वर्षीय कट्टर समर्थकाचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाल्याचे म्हटले जात आहे.
'दादा... आम्हाला सोडून जाऊ नका... परत या!' या हृदय हेलावून टाकणाऱ्या आक्रोशात बारामती अक्षरशः अश्रूंनी न्हाऊन निघाली होती. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला. त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यदर्शनासाठी आणि अंत्ययात्रेसाठी बारामतीत जनसागर उसळला होता. पहाटेपासूनच बारामतीच्या रस्त्यांवर शांतता पसरली होती. दुकानांचे शटर खाली, रस्त्यांवर सन्नाटा आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर शोकभाव होते. अजित पवारांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येताच नागरिक, कार्यकर्ते, महिला, वृद्ध, युवक मोठ्या संख्येने दाखल झाले. अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तर ओठांवर 'अजितदादा अमर रहे', ही एकच हाक होती. अजितदादांचे जाणे सहन झाले नाही, कट्टर समर्थकाला हृदयविकाराचा तीव्र झटका
मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार यांच्या निधनाची बातमी ऐकून त्यांच्या एका कट्टर समर्थकाचाही मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडल्याचे समोर आले आहे. अजितदादांचे अचानक जाणे सहन न झाल्याने समर्थकाला हृदयविकाराचा तीव्र धक्का आला. यातच त्यांचे निधन झाले. नाशिकमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. सुदाम बोडके (Sudam Bodke) असे या समर्थकाचे नाव असून ते ६३ वर्षांचे होते, असे म्हटले जात आहे.
दरम्यान, सुदाम बोडके हे अजित पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून परिचित होते. ते दिंडोरी तालुक्यातील रहिवासी होते. अजित पवार यांच्या मृत्यूची बातमी ऐकून सुदाम बोडके यांना तीव्र धक्का बसला. ही बातमी ऐकल्यावर ते अचानक अस्वस्थ झाले. त्यांच्यावर काही उपचार करण्यापूर्वीच बोडके यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांचे निधन झाले.
Web Summary : Following Ajit Pawar's funeral in Baramati, a 63-year-old ardent supporter, Sudam Bodke from Nashik, tragically died of a heart attack, unable to bear the news of his leader's passing. He was a resident of Dhakambe village.
Web Summary : बारामती में अजित पवार के अंतिम संस्कार के बाद, नासिक के 63 वर्षीय कट्टर समर्थक सुदाम बोडके का नेता के निधन की खबर सहन न कर पाने के कारण दिल का दौरा पड़ने से दुखद निधन हो गया। वह ढकांबे गांव के निवासी थे।