अजितदादांच्या विमानाला अपघात कसा झाला? अखेरच्या क्षणी काय परिस्थिती होती,AAIBचा प्राथमिक अहवाल समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2026 22:18 IST2026-02-28T19:18:38+5:302026-02-28T22:18:33+5:30

Ajit Pawar Plane Crash Update: अजित पवार यांच्या विमानाला झालेल्या अपघातातबाबत अनेक शंका कुशंका उपस्थित होत असतानाच या विमान अपघातामागच्या कारणांचा तपास करत असलेल्या AAIB प्राथमिक अहवाल आज समोर आला आहेत. तसेच या अहवालामधून अपघातातबाबत काही धक्कादायक माहिती उघड झाली आहे.

Ajit Pawar Plane Crash Update: How did Ajit Pawar's plane crash? DGCA releases preliminary report, shocking information revealed | अजितदादांच्या विमानाला अपघात कसा झाला? अखेरच्या क्षणी काय परिस्थिती होती,AAIBचा प्राथमिक अहवाल समोर

अजितदादांच्या विमानाला अपघात कसा झाला? अखेरच्या क्षणी काय परिस्थिती होती,AAIBचा प्राथमिक अहवाल समोर

महाराष्ट्राचे तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे प्रमुख अजित पवार यांच्या अपघाती निधनाला आज एक महिना पूर्ण झाला आहे. अजित पवार यांच्या विमानाला झालेल्या अपघातातबाबत अनेक शंका कुशंका उपस्थित होत असतानाच या विमान अपघातामागच्या कारणांचा तपास करत असलेल्या AAIBचा प्राथमिक अहवाल आज समोर आला आहेत. तसेच या अहवालामधून अपघातातबाबत काही धक्कादायक माहिती उघड झाली आहे.

अजित पवार यांच्या विमानाला झालेल्या भीषण अपघाताबाबतची प्राथमिक माहिती AAIBने २२ पानी अहवालाच्या माध्यमातून मांडली आहे. या अहवालातून समोर आलेल्या  माहितीनुसार अजित पवार हे मुंबईहून बारामतीला जात होते ते विमान अपघात होण्यापूर्वी काही काही क्षण आधी एका झाडाला आदळले आणि नंतर जमिनीवर कोसळले. सकाळी ८ वाजून ४६ मिनिटांनी हा अपघात झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

अजित पवार यांच्या विमानाला अपघात झाला तेव्हा बारामती विमानतळाच्या परिसरात दृश्यमानता कमी होती, असेही सांगण्यात येत होते.  दरम्यान, अपघात झाला तेव्हा या परिसरामध्ये सुमारे २ हजार मीटरपर्यंत दृष्यमानता होती, असेही या प्राथमिक अहवालामधून समोर आले आहे. तसेच दोन्ही वैमानिकांना बारामती येथे विमान उतरवण्याचा अनुभव होता. अपघात झाला तेव्हा हे विमान धावपट्टीपासून सुमारे ५० मीटर आधी कोसळले, अशी माहितीही अहवालात नमूद करण्यात आली आहे. 

या प्राथमिक अहवालामधून देण्यात आलेल्या माहितीनुसार सकाळी ८ वाजून १९ मिनिटांनी वैमानिकांचा बारामती एटीसीसोबत संवाद सुरू झाला होता. तसेच  दोन्ही वैमानिकांची ब्रेथ अॅनालायझर टेस्ट ही निगेटिव्ह आलेली होती, अशी माहिती समोर आली आहे. मात्र डीजीसीएच्या अहवालातील धक्कादायक बाब म्हणजे अपघातानंतर विमानातील ब्लॅक बॉक्समधील फ्लाईट रेकॉर्डर डेटा हा प्रचंड उष्णतेमुळे खराब झाला आहे. मात्र ब्लॅक बॉक्समधील रॉ डेटा डाऊनलोड करण्यात यश आलं आहे. 

Web Title : अजित पवार के विमान दुर्घटना: DGCA की प्रारंभिक रिपोर्ट में खुलासे

Web Summary : अजित पवार के विमान दुर्घटना पर DGCA की रिपोर्ट के अनुसार, विमान बारामती के पास दुर्घटनाग्रस्त होने से पहले एक पेड़ से टकराया। यह घटना सुबह 8:46 बजे हुई। 22 पन्नों की रिपोर्ट दुर्घटना से पहले के पलों का विवरण देती है।

Web Title : Ajit Pawar's Plane Crash: DGCA Preliminary Report Reveals Details

Web Summary : DGCA's report on Ajit Pawar's plane crash reveals the aircraft hit a tree before crashing near Baramati. The incident occurred at 8:46 AM. The 22-page report details the moments leading up to the accident, offering insights into the possible causes.