"जर ब्लॅक बॉक्स बंद असल्याचं कारण दिलं गेलं, तर मी म्हणतोय, तसं...!" आता रोहित पवारांनी व्यक्त केली नवी शंका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 20:32 IST2026-02-12T20:31:46+5:302026-02-12T20:32:55+5:30

भारतीय यंत्रणा असणे आवश्यक आहे. राज्याकडून मुख्यमंत्र्यांनी सीआयडी दिली आहे. तेही चांगलीच गोष्ट आहे. त्याच बरोबोर इंटरनॅशनल एजन्सीही असणे आवश्यक आहे. या सर्वांचे कॉम्बीनेशन करून पारदर्शक स्वरुपाचा तपास झाला तर त्यातून खऱ्या गोष्टी समोर येतील."

ajit pawar plane crash Rohit Pawar expresses new doubts about black box | "जर ब्लॅक बॉक्स बंद असल्याचं कारण दिलं गेलं, तर मी म्हणतोय, तसं...!" आता रोहित पवारांनी व्यक्त केली नवी शंका

"जर ब्लॅक बॉक्स बंद असल्याचं कारण दिलं गेलं, तर मी म्हणतोय, तसं...!" आता रोहित पवारांनी व्यक्त केली नवी शंका

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाता संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्याकडून सातत्याने शंका उपस्थित केल्या जात आहेत. त्यांनी गेल्या १० फेब्रुवारीला एक पत्रकार परिषद घेत पीपीटीच्या माध्यमाने या अपघाता संदर्भात घातपाताचा संशय व्यक्त केला होता. यानंतर आज राजधानी दिल्लीतून त्यांनी पुन्हा एकदा यासंदर्भात भाष्य केले आहे. "जर, ब्लॅक बॉक्स बंद असल्याने आम्हाला तपास करता येत नाही, असे कारण दिले गेले, तर मी म्हणतोय, त्यावर शिक्का मोर्तब होईल आणि दादांचा अपघात नव्हता, तर घात होता, हे स्पष्ट  होईल", असे रोहित पवार यांनी म्हटले आहे. 

"...तर त्यातून खऱ्या गोष्टी समोर येतील"
विमान अपघातासंदर्भात बोलातना रोजित पवार म्हणाले, "या प्रकरणात क्रिमिनल इनव्हेस्टीगेशनची आवश्यकता आहे. भारतीय यंत्रणा असणे आवश्यक आहे. राज्याकडून मुख्यमंत्र्यांनी सीआयडी दिली आहे. तेही चांगलीच गोष्ट आहे. त्याच बरोबोर इंटरनॅशनल एजन्सीही असणे आवश्यक आहे. या सर्वांचे कॉम्बीनेशन करून पारदर्शक स्वरुपाचा तपास झाला तर त्यातून खऱ्या गोष्टी समोर येतील." याच वेळी, "२०२३ मध्ये मुंबईचा व्हीएसआर कंपनीच्या विमानाचा जो अपगात झाला होता, त्याच्या तपासाचा अहवाल अद्यापही आलेला नाही," असेही रोहित पवार म्हणाले.

"…तर मी म्हणतोय, त्यावर शिक्का मोर्तब होईल" -
काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांचे म्हणणे आहे की, व्हीएसआर कंपनीकडून विमानातील ब्लॅक बॉक्स बंद ठेवण्यात येतो. जर ब्लॅक बॉक्स बंद ठेवला तर कुठली माहिती समोर येणार? असे विचारले असता रोहित पवार म्हणाले, “विमानातील ब्लॅक बॉक्स बंद ठेवता येत नाही आणि अतूल लोंढे जसे म्हणत आहेत तसे, ब्लॅक बॉक्स बंद केला असले अथवा मुंद्दामहून आज सांगण्यात येत आहे की, ब्लॅक बॉक्स बंद होता. म्हणजे, खऱ्या गोष्टी बाहेर येऊ नयेत, म्हणून आतापासूनच एक कारण लोकांमध्ये पेरले जात आहे, असे आपल्याला म्हणावे लागेल. ब्लॅक बॉक्स बंद ठेवता येत नाही. जर, ब्लॅक बॉक्स बंद असल्याने आम्हाला तपास करता येत नाही, असे कारण दिले गेले, तर मी म्हणतोय, त्यावर शिक्का मोर्तब होईल आणि दादांचा अपघात नव्हता, तर घात होता, हे स्पष्ट  होईल," असे पवार यावेली म्हणाले.

Web Title : रोहित पवार को अजित पवार के विमान दुर्घटना में साजिश का संदेह।

Web Summary : रोहित पवार ने अजित पवार के विमान दुर्घटना पर साजिश की आशंका जताई। उन्होंने अंतरराष्ट्रीय एजेंसियों सहित गहन जांच की मांग की। पवार का मानना है कि बंद ब्लैक बॉक्स साजिश की पुष्टि करता है अगर कारण बताया जाए।

Web Title : Rohit Pawar suspects conspiracy in Ajit Pawar's plane crash case.

Web Summary : Rohit Pawar raises concerns about Ajit Pawar's plane crash, suspecting foul play. He demands thorough investigation, including international agencies. Pawar believes a closed black box confirms conspiracy if cited as reason.