राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी, २८ जानेवारी २०२६ रोजी भीषण विमान अपघातात दुर्दैवी निधन झाल्याची धक्कादायक घटना घडल्याचे वृत्त समोर आले. या बातमीमुळे संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध पक्षांतील दिग्गज नेते आणि इतर क्षेत्रांतील मान्यवरांनी अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली आहे. सचिन तेंडुलकर, अजिंक्य रहाणे यांच्यासह माजी क्रिकेटपटू युसूफ पठाण याने ट्विटच्या माध्यमातून दु:ख व्यक्त केले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
सचिन तेंडुलकरने या शब्दांत वाहिली श्रद्धांजली
क्रिकेटचा देव आणि भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनीही ट्विटरच्या माध्यमातून शोक व्यक्त करत पवार कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी असल्याचे म्हटले आहे. सचिन तेंडुलकर यांनी अधिकृत एक्स अकाउंटवरुन केलेल्या ट्विटमध्ये लिहिलंय की, अजित पवार यांच्या निधनाची बातमी ऐकून खूप दुःख झाले. महाराष्ट्रासाठी काम करणारा एक चांगला नेता आज आपण अचानक गमावला आहे. पवार कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. भावपूर्ण श्रद्धांजली. ओम शांती.
Ajit Pawar Death News Live: महाराष्ट्राने आज उमदा नेता गमावल्याचं म्हणत राज ठाकरेंनी जागवल्या आठवणी
भारताचा क्रिकेटर अजिंक्य रहाणे यांने देखील ट्विटरच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार यांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.
युसूफ पठाणने श्रद्धांजली वाहताना केली विमान अपघाताची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी
महाराष्ट्राचे माननीय उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांच्या भीषण विमान अपघातात झालेल्या अकाली निधनाने मी अत्यंत दुःखी आणि व्यथित आहे. ते राज्यासाठी अत्यंत निष्ठेने, प्रामाणिकपणे आणि समर्पणभावनेने काम करणारे एक कर्तव्यदक्ष नेते होते. सार्वजनिक जीवनातील त्यांचे योगदान आणि राज्याच्या विकासासाठी केलेले कार्य नेहमीच स्मरणात राहील. या गहन दुःखाच्या क्षणी माझ्या संवेदना आणि प्रार्थना त्यांच्या कुटुंबीयांबरोबर, समर्थकांबरोबर आणि संपूर्ण राज्यातील जनतेबरोबर आहेत. दिवंगत आत्म्यास चिरशांती लाभो. या विमान अपघाताची सखोल आणि योग्य चौकशी झाली पाहिजे.
बातमी ऐकून मोठा धक्का बसला!
भारताचा क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मोहम्मद अझहरुद्दीन यांनी एक्स अकाउंटवरून ट्विटच्या माध्यमातून दु:ख व्यक्त करताना लिहिलंय की, श्री. अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या वृत्ताने मी अत्यंत हादरून गेलो आहे. त्यांच्या कुटुंबीयांप्रती माझ्या मनःपूर्वक संवेदना. दिवंगत आत्म्यास चिरशांती लाभो आणि या अपार दुःखाला सामोरे जाण्याची शक्ती व धैर्य त्यांच्या कुटुंबाला देव देवो.
Web Summary : Deputy Chief Minister Ajit Pawar tragically died in a plane crash. Maharashtra mourns. Leaders across parties, including PM Modi and CM Fadnavis, offered condolences. Sachin Tendulkar also expressed grief, sharing his sympathy with the Pawar family in this difficult time.
Web Summary : उपमुख्यमंत्री अजित पवार का विमान दुर्घटना में दुखद निधन हो गया। महाराष्ट्र शोक में डूबा। पीएम मोदी और सीएम फडणवीस सहित विभिन्न दलों के नेताओं ने संवेदना व्यक्त की। सचिन तेंदुलकर ने भी शोक व्यक्त करते हुए पवार परिवार के प्रति संवेदना व्यक्त की।