'अजितदादांच्या विमानात आत्मघाती हल्लेखोर? वैमानिक संमोहित', मिटकरींचा आणखी एक सनसनाटी दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2026 14:29 IST2026-02-08T14:25:05+5:302026-02-08T14:29:33+5:30

Ajit Pawar Death News: राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनीही अजित पवार यांच्या निधनाबाबत शंका उपस्थित केली होती. आता मिटकरी यांनी अजित पवार यांच्या अपघाताबाबत आणखी एक सनसनाटी दावा केला आहे.

Ajit Pawar Death News: 'Suicide bomber on Ajit Pawar's plane? Pilot hypnotized', Amol Mitkari's another sensational claim | 'अजितदादांच्या विमानात आत्मघाती हल्लेखोर? वैमानिक संमोहित', मिटकरींचा आणखी एक सनसनाटी दावा

'अजितदादांच्या विमानात आत्मघाती हल्लेखोर? वैमानिक संमोहित', मिटकरींचा आणखी एक सनसनाटी दावा

महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे प्रमुख अजित पवार यांच्या अपघाती निधनाला आज १२ दिवस झाले आहेत. या काळात अजित पवार यांच्या अपघाती निधनाबाबत वेगवेगळे दावे केले जात आहेत. तसेच विमानाला झालेल्या अपघाताबाबत अनेक शंका कुशंका व्यक्त केल्या जात आहेत. राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनीही अजित पवार यांच्या निधनाबाबत शंका उपस्थित केली होती. आता मिटकरी यांनी अजित पवार यांच्या अपघाताबाबत आणखी एक सनसनाटी दावा केला आहे.

अजित पवार यांचा घातपात करण्यासाठी विमानात सुसाईड बॉम्बरचा वापर करण्यात आला असावा का? अशी शंका आमदार अमोल मिटकरी यांनी उपस्थित केली आहे. तसेच या विमानाच्या वैमानिकालाही संमोहित करण्यात आलं होतं का? असा प्रश्नही अमोल मिटकरी यांनी विचारला आहे. गेल्या काही दिवसांपासून अजित पवार यांच्या मृत्यूबाबत वेगवेगळे दावे करत असलेल्या अमोल मिटकरी यांनी केलेल्या या दोन नव्या सनसनाटी दाव्यांमुळे अजित पवार यांच्या विमानाला झालेल्या अपघात प्रकरणातील संशयाचे धुके अधिकच गडद झालं आहे.

दरम्यान, अजित पवार प्रवास करत असलेल्या विमानामधून सहा प्रवासी प्रवास करत असल्याचे सांगण्यात येत होते. पाच जणांचा मृत्यू झाला. मत त्यातला सहावा प्रवासी कुठे गेला, असा सवालही मिटकरी यांनी याआधी उपस्थित केला होता. तसेच महाराष्ट्र पुरावा मागतोय DGCAनी विमानतळावरील CCTV फुटेज प्रसारित करून दादाच्या आगमनापासून विमानात बसेपर्यंत प्रत्यक्षदर्शी पुरावा सादर करावा", अशी मागणी त्यांनी केली  होती. विमानात ६ लोक होते, तर ५ मृतदेह का मिळाल्या? ज्या प्रकारे अपघात झाला, त्या विमानात बॉम्ब होता का? असा सवालही सोनावणे यांनी उपस्थित केला होता. 

Web Title : अजित पवार का विमान: आत्मघाती हमलावर? पायलट सम्मोहित, मिटकरी का दावा।

Web Summary : अमोल मिटकरी ने अजित पवार की मौत पर संदेह जताया, पूछा क्या आत्मघाती हमलावर शामिल था और क्या पायलट सम्मोहित था। उन्होंने सीसीटीवी फुटेज की मांग की, जिससे विमान दुर्घटना पर संदेह गहरा गया।

Web Title : Ajit Pawar's plane: Suicide bomber? Pilot hypnotized, claims Mitkari.

Web Summary : Amol Mitkari raises suspicion about Ajit Pawar's death, questioning if a suicide bomber was involved and if the pilot was hypnotized. He also demands CCTV footage, fueling doubts about the plane crash.