शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

मावशीचं घर आणि बालपणीचं बागडणं... फुलंब्रीशी जोडलेली एक हळवी नाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 06:05 IST

Ajit Pawar Death News: राजकारणात ज्यांची ओळख कठोर निर्णय, ठाम भूमिका आणि कणखर नेतृत्व अशी होती, तेच उपमुख्यमंत्री अजित पवार फुलंब्रीत आले की मात्र वेगळेच दिसायचे. इथे ना पदाचा भार, ना सत्तेचा रुबाब- फक्त असायचं मावशीचं घर, ओळखीची माती, बालपणीच्या आठवणी आणि नात्यांची ऊब.

फुलंब्री (जि. छत्रपती संभाजीनगर) : राजकारणात ज्यांची ओळख कठोर निर्णय, ठाम भूमिका आणि कणखर नेतृत्व अशी होती, तेच उपमुख्यमंत्री अजित पवार फुलंब्रीत आले की मात्र वेगळेच दिसायचे. इथे ना पदाचा भार, ना सत्तेचा रुबाब- फक्त असायचं मावशीचं घर, ओळखीची माती, बालपणीच्या आठवणी आणि नात्यांची ऊब.

फुलंब्री हे केवळ एक गाव नव्हतं, तर दादांच्या आठवणींचं, ऋणानुबंधांचं आणि बालपणाच्या खेळण्या-बागडण्याचं घर होतं. मावशी सुषमा बाळासाहेब देशमुख यांचं घर म्हणजे दादांसाठी भावनिक जिव्हाळा होता. उन्हाळ्याच्या सुट्ट्या, दिवाळीची धामधूम, मावस भावांसोबतच खेळणं अन् अंगणातल्या गप्पा.. या सगळ्यातूनच एक नेता घडत होता; पण, त्याआधी एक संवेदनशील माणूस जगत होता. ‘दादा कितीही मोठे झाले तरी इथे आले की ते आमचे  मावसभाऊ असायचे, छत्रपती संभाजीनगरला आले की मावशीची भेट न घेता कधीही परत जात नव्हते, असे सांगताना मावसभाऊ नितीन देशमुख यांना अश्रू अनावर झाले.

कोरोनाच्या काळातही दादांनी वेळ काढून मावशीची भेट घेत चांगल्या दोन तास गप्पा केल्या होत्या. त्यानंतर काही दिवसांतच मावशीचे निधन झाले. 

राजकारणात येऊन बनले विकासाचा आधारस्तंभ- फुलंब्रीसाठी अजित पवार केवळ नातेवाईक नव्हते, तर विकासाचा आधारस्तंभ होते.- पाथ्री, निधोना परिसरातील ३३ केव्ही विद्युत केंद्राचा प्रश्न असो की वर्षानुवर्षे बंद पडलेला देवगिरी सहकारी साखर कारखाना अवसायनातून बाहेर काढण्यासाठी केलेले प्रयत्न, दादांनी फुलंब्रीकडे कधीही पाठ फिरवली नाही.- आज कारखाना कर्जमुक्त  होऊन नव्या गाळपाच्या उंबरठ्यावर उभा आहे, तेव्हा शेतकऱ्यांच्या मनात अजितदादांबद्दल कृतज्ञतेचा सूर उमटतो. 

English
हिंदी सारांश
Web Title : Ajit Pawar's Fulambri Connection: Nostalgia, Family, and Development Rooted Deep.

Web Summary : For Ajit Pawar, Fulambri is more than a village; it's a treasure of childhood memories centered around his aunt's home. Despite his political stature, he remained connected to his roots, supporting local development projects like the sugar factory, earning villagers' gratitude.
टॅग्स :Ajit Pawarअजित पवारFamilyपरिवारPlane Crashविमान दुर्घटनाchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर