शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
2
"निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
3
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
4
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांचे वादग्रस्त विधान
5
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
6
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
7
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
8
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
9
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
10
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट
11
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
12
Income Tax Saving Tips: EEE कॅटेगरीत येतात 'या' ४ स्कीम्स, यात पैसे गुंतवाल तर ३ पद्धतीनं वाचेल टॅक्स
13
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: बुध म्हणजे 'राजकुमार'; उत्तम वाणी, प्रखर बुद्धी, चिरतारुण्याचं वरदान
14
‘पुंछमध्ये IAF च्या ताफ्यावर झालेला हल्ला ही स्टंटबाजी, जेव्हा निवडणुका येतात तेव्हा..’ काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी यांचं विधान
15
PHOTOS : मोकळे केस अन् घायाळ करणाऱ्या अदा; धनश्री वर्माचा बोल्ड लूक!
16
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
17
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
18
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
19
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
20
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी

अजित पवारांच्या क्लिन चीटला आक्षेप; एसीबीच्या प्रतिज्ञापत्रावर भाजपाकडून प्रश्नचिन्ह

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2019 3:17 PM

एसीबीनं मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेलं प्रतिज्ञापत्र दिशाभूल करणारं असल्याचा दावा

नागपूर: राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अजित पवार यांना सिंचन घोटाळ्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं दिलेल्या क्लिन चीटला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेप नोंदवला आहे. एसीबीनं मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेलं प्रतिज्ञापत्र दिशाभूल करणारं असल्याचा दावा फडणवीसांनी केला. या प्रकरणात गरज पडल्यास आम्ही स्वतंत्रपणे हस्तक्षेप करू असंदेखील त्यांनी म्हटलं. ते नागपुरात पत्रकारांशी बोलत होते. सत्तर हजार कोटी रुपयांच्या सिंचन घोटाळा प्रकरणात एसीबीनं दाखल केलेलं प्रतिज्ञापत्र दिशाभूल करणारं असून न्यायालय ते स्वीकारणार नाही. एसीबीनं उच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातून अधिकाऱ्यांनी हा घोटाळा केल्याचं ध्वनित होतं. त्यामुळे या प्रतिज्ञापत्राला आमचा विरोध आहे. २०१८ मध्ये या प्रकरणी एसीबीनं न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केलं होतं. मात्र ते टाळून नवं प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलं. या नव्या प्रतिज्ञापत्राला आमचा आक्षेप आहे, असं फडणवीसांनी सांगितलं. सिंचन घोटाळ्यात एसीबीनं उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करुन अजित पवारांना क्लिन चीट दिली आहे. त्यामुळे अजित पवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. सिंचन विभागाशी संबंधित २६५४ निविदांची सध्या चौकशी सुरू आहे. यापैकी ४५ प्रकल्प विदर्भ पाटबंधारे महामंडळाचे आहेत. यापैकी २१२ निविदा प्रकरणांची चौकशी पूर्ण झाली असून यापैकी २४ प्रकरणांची नोंदणी करण्यात आली आहे. या २४ प्रकरणांपैकी ५ प्रकरणांमध्ये आरोपपत्र दाखल करण्याचं काम पूर्ण झालं आहे. यापैकी पुरावे नसल्यानं ४५ निविदांची चौकशी बंद करण्यात आली आहे. यातील एकूण ९ केसेस बंद करण्यात आल्या आहेत. यातील कोणत्याही प्रकरणांशी अजित पवारांचा काहीही संबंध नसल्याचं एसीबीनं प्रतिज्ञापत्रात नमूद केलं आहे. मात्र आणखी काही माहिती समोर आल्यास, तसंच जर न्यायालयानं त्याबाबत काही आदेश दिल्यास या प्रकरणाची पुन्हा चौकशी केली जाऊ शकते असं एसीबीनं म्हटलं आहे. त्यामुळे न्यायालय आता काय निर्णय देणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा