शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
3
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
4
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
5
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
6
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
7
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
8
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
9
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
10
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
11
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
12
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
13
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
14
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
15
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
16
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
17
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
18
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
19
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
20
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

एड्स हेल्पलाइनचा ‘मराठी’ला ठेंगा

By admin | Updated: January 12, 2015 03:34 IST

‘नमस्कार, राष्ट्रीय एड्स नियंत्रण संघटन आपका एड्स हेल्पलाइन मे स्वागत करता है’. हिंदी के लिए १, फॉर इंग्लिश २, मराठीसाठी ३, अन्य भाषांसाठी ४ आणि पुन्हा ऐकण्यासाठी ९ दाबा

पूजा दामले, मुंबई‘नमस्कार, राष्ट्रीय एड्स नियंत्रण संघटन आपका एड्स हेल्पलाइन मे स्वागत करता है’. हिंदी के लिए १, फॉर इंग्लिश २, मराठीसाठी ३, अन्य भाषांसाठी ४ आणि पुन्हा ऐकण्यासाठी ९ दाबा.... हे रेकॉर्डिंग १०९७ या क्रमांकावर फोन केल्यास ऐकू येते. पण पुढे जात ३ हा मराठीचा पर्याय निवडल्यास कोणताही समुपदेशक फोन उचलत नाही. वारंवार प्रयत्न केल्यानंतर हिंदी भाषिक समुपदेशक फोन उचलतो. ‘लोकमत’ प्रतिनिधींनी वेगवेगळ्या वेळेस या हेल्पलाइनवर ९ वेळा कॉल्स केले. पण, एकदाही मराठी समुपदेशकाशी बोलणे होऊ शकले नाही. दोन वेळा तर चक्क ‘मराठी नहीं’ असे सांगितले. तर काहीवेळा मराठी समुपदेशकाकडे फोन देतो, असे सांगून फोन वेटिंगवर टाकण्यात आले. १ डिसेंबर २०१४ रोजी ‘नॅको’ आणि पिरामल स्वास्थ्य यांच्या संयुक्त विद्यमाने एड्सविषयी सामान्यांना माहिती मिळावी म्हणून राष्ट्रीय हेल्पलाइन (१०९७) सुरू करण्यात आली आहे. देशपातळीवर सुरू झालेल्या या हेल्पलाइनवर मराठीसह एकूण आठ भाषांमध्ये माहिती मिळणार असल्याचे घोषित करण्यात आले होते. पण, हेल्पलाइन सुरू होऊन एक महिना १० दिवस उलटूनही या क्रमांकावर मराठीत कवडीची माहिती उपलब्ध होत नाही.एड्स कशामुळे होतो, एड्सची तपासणी कुठे करता येईल, असे नेहमीचे प्रश्न विचारल्यावर हिंदी भाषिक समुपदेशकांनी उत्तरे देण्यास सुरुवात केली. पण, हिंदी नीट समजत नाही, मराठीमध्ये सांगू शकता का? असे विचारल्यावर ‘अब नही बाद में फोन करो, मराठी आदमी अभी नही है’, अशी उत्तरे दिली. पण, मराठीत उत्तर हवे असल्यास नक्की कोणत्या वेळी फोन करायचा याचे ठोस उत्तर एकदाही मिळालेले नाही. तर, जनजागृतीसाठी पथनाट्य ठेवायचे असल्यास कुठे संपर्क करायचा? असे विचारल्यावर ‘हिंदी में बात किजीए’, असे सांगण्यात आले. पण शेवटपर्यंत नेमके उत्तर मिळालेच नाही. एड्ससाठीची हेल्पलाइन २४ तास सुरू असते. आत्तापर्यंत ९० हजार कॉल्स या हेल्पलाइनवर आले आहेत. या हेल्पलाइनसाठी चार मराठी समुपदेशक तीन पाळ्यांमध्ये कार्यरत असतात. ‘साधन’ हेल्पलाइनवर मराठीमध्ये माहिती मिळते. ‘साधन’वर मराठी भाषिकांचे कॉल्स येतच असतात. ही हेल्पलाइन सध्या राष्ट्रीय हेल्पलाइनशी जोडण्याचा विचार सुरू आहे. मराठीमध्ये प्रश्न विचारल्यास मराठीमध्ये उत्तर मिळते, असा दावा हेल्पलाइनचे कामकाज पाहणाऱ्या मुख्य अधिकाऱ्यांनी केला आहे. रोज अनेक कॉल्स येत असतात, त्यांना योग्य ती माहिती दिली जाते. पण, तुम्ही सांगता त्याप्रमाणे काही होत असल्यास त्यात लक्ष घातले जाईल, असे नाव न छापण्याच्या अटीवर मुख्य अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला सांगितले.