शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
9
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
10
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
11
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
12
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
13
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
14
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
15
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
16
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
17
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
18
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
19
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
20
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये व्यापा-यांना कारणे दाखवा नोटीस बजावणार- कृषी उत्पन्न बाजार समिती

By admin | Updated: July 11, 2016 17:36 IST

लिलावात सहभागी होण्यासाठी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद न देणार्‍या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या लासलगाव व इतर उपआवारावरील 450 व्यापा-यांना अनुज्ञप्ती परवाने निलंबित

ऑनलाइन लोकमत

लासलगाव (नाशिक), दि. 11 - शासनाच्या अध्यादेशाला विरोध करणा-या व्यापा-यांनी सोमवार (दि. 11) पासून लिलावात सहभागी होण्यासाठी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद न देणार्‍या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या लासलगाव व इतर उपआवारावरील 450 व्यापा-यांना अनुज्ञप्ती परवाने निलंबित करण्याबाबत तसेच बाजार समितीचे व्यापारी गाळे व व्यवसायाकरिता दिलेले प्लॉट्स परत घेण्याकरिता कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात येणार आहेत, अशी माहिती लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जयदत होळकर, उपसभापती सुभाषराव कराड आणि सचिव बी. वाय. होळकर यांनी दिली.नासिकचे जिल्हा उपनिबंधक निळकंठ कर्हे  यांनी शेतकरी हिता करीता शेतीमाल सुरू करण्याकरता जे व्यापारी अडथळा निर्माण करतील अशा व्यापारी वर्गाच्या परवाने निलंबित करण्याची कारवाई करावी .तसेच शेतमाल खरेदी-विक्रीसाठी अडथळा निर्माण करतील अशा व्यापारी वर्गाचे गाळे तसेच व्यवसाय करण्याकरता दिलेले प्लॉट्स  त्वरीत परत घेण्याकरता कार्यवाही करून त्याचा अनुपालन अहवाल सोमवार सायंकाळ पर्यंत सादर करण्याचे आदेश नासिक जिल्हयातील सर्व बाजार समितीच्या कार्यालयाला  दिले आहेत.त्यानुसार ही कार्यवाही करण्याची लगबग बाजार समितीचे कार्यालयात सुरू होती.लासलगाव येथील मुख्य आवार तसेच निफाड ,विंचूर , उगाव , खानगाव , नैताळे येथील उपआवारावरील 450 व्यापार्यांना  कारणे दाखवा नोटीस दिल्या आहेत.शनिवारी  सोमवारी शेतकरी हिता करीता सोमवार पासून लिलावात सहभागी व्हावे तसेच    लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची बैठक होउन शेतकरी हितासाठी लिलावाच्या अन्य पर्यायांचा विचार करण्यात येईल असे  लासलगाव  बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर व उपसभापती सुभाष कराड  यांनी सांगितले होते. तरीही    सोमवारी व्यापारी सहभागी न झाल्याने लासलगाव येथील व उपआवारावरील शेतीमाल लिलाव बंद राहीले.शासनाच्या नियमन मुक्तीच्या अध्यादेशात फळे व भाजीपाल्याचे नियमन रद्दकरण्याबरोबरच अडत शेतक-यांऐवजी खरेदीदारांकडुन घेणेबाबत शासनाने जो निर्णय घेतलेला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व व्यापारी कामकाज करणेस असमर्थ असल्याच्या कारणावरूनदि. 09 पासुन सर्व व्यापारी लिलावात सहभागी होणार नसल्याचे असोशिएशनने बाजार समितीस कळविले आहे. त्यामुळे लिलाव सुरू होणेबाबत संचालक मंडळाने प्रयत्न सुरू केलेशनीवारी संपन्न झालेल्या  बैठकीस बाजार समितीचे सदस्य राजेंद्र डोखळे, पंढरीनाथ थोरे, भास्करराव   पानगव्हाणे, मोतीराम मोगल, बाळासाहेब क्षिरसागर, अशोकराव  गवळी, वैकुंठराव  पाटील, संदीप दरेकर,सचिन ब्रम्हेचा, रमेश पालवे, सचिव बी. वाय. होळकर यांचेसह अनिल सोनवणे उपस्थित होतेव्यापारी यांचे  कडून  प्रतिसाद न मिळाल्याने शासनाने पर्यायी विक्री व्यवस्थेसाठी स्थापन केलेले नोंदणीकृत थेट पणन परवानाधारक, शेतकरी समुह, शेतकरी सहकारी संस्था, ग्राहक सहकारी संस्था, महिला बचत गट,सेवा सहकारी संस्था, शेतकरी कंपनी, शेतकरी गट, खाजगी उद्योग, नोंदणीकृत कंपन्या, व्यक्तीआणि भागीदारी संस्था, नाफेड व मार्केटींग फेडरेशन यांचेमार्फत खरेदी-विक्री सुरू करणेसाठी शासनाकडे पाठपुरावा केला आहे असे हमे.. तसेच शेतमाल खरेदी-विक्रीसाठी इच्छुक असलेल्या अन्यव्यापा-यांना बाजार समितीमार्फत सुविधा पुरविण्याचा विचार करण्यात यावा अशा विविध पर्यायांवर यावेळी चर्चा करण्यात आली.सदर लिलाव बंद ने कोट्यावधी रुपयांचे व्यवहार ठप्प झाले आहे