शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

कार्यक्रमपत्रिका, स्मरणिकेचा नाही पत्ता

By admin | Updated: January 21, 2017 03:29 IST

९० वे मराठी साहित्य संमेलन स्मार्ट करण्याचा मानस जरी आयोजक आगरी युथ फोरमने व्यक्त केला

डोंबिवली : ९० वे मराठी साहित्य संमेलन स्मार्ट करण्याचा मानस जरी आयोजक आगरी युथ फोरमने व्यक्त केला असला, तरी अद्याप संमेलनाची कार्यक्रम पत्रिका आणि स्मरणिका छापून तयार झालेली नाही आणि त्याबाबत आयोजकांनी मिठाची गुळणी धरली आहे. साहित्य संमेलनाचा मान डोंबिवलीतील आगरी युथ फोरमला मिळाल्यानंतर त्याच्या आयोजनासाठी स्वागताध्यक्ष गुलाब वझे यांनी बैठका घेण्यास सुरुवात केली. महामंडळ आणि आयोजकांत बैठका पार पडल्या. बदलापूर, ठाणे आणि कल्याण येथे साहित्य संमेलनाच्या वातावरण निर्मितीसाठी कार्यक्रम घेण्यात आले. शाळाशाळांत जागृती करण्याचे ठरले. संमेलनाच्या तारखेची घोषणा झाल्यानंतर तीन दिवसांत प्रमुख १२ कार्यक्रम, परिसंवाद अशी रचनाही ठरली. संमेलन अवघ्या बारा दिवसांवर आल्याने कार्यक्रम पत्रिका छापून ती साहित्यिकांपर्यंत पोचणे अपेक्षित होते. अर्थात संमेलनासाठी आमंत्रित करण्यात आलेल्या काही वक्त्यांचे संमतीपत्र अद्याप मिळाले नसल्याने संमेलनाच्या निमंत्रण व कार्यक्रम पत्रिकेच्या छपाईत अडसर निर्माण झाला आहे. तोच प्रकार स्मरणिकेच्या बाबतीत आहे. साहित्य संमेलनासाठी निधी गोळा करण्याची कसरत सुरू असल्याने स्मरणिका, तिचा खर्च याबाबत कोणी बोलायला तयार नाही. पिंपरी-चिंचवडच्या संमेलनाची स्मरणिका एका ग्रंथासारखीच काढण्यात आली होती. त्या दर्जाची स्मरणिका करण्याचे सुरूवातीला ठरविण्यात आले असले, तरी अद्याप लेखांची जुळवाजुळव सुरु असल्याने तिची छपाई रखडल्याचे समजते. महामंडळाचे ११०० सदस्य, सर्व संलग्न संस्था, कल्याण-डोंबिवलीतील शाळा-कॉलेज, आमदार, खासदार, साहित्यिक, प्रतिष्ठीत व्यक्ती, कलाकार आदींना संमेलनाचे निमंत्रण द्यायचे आहे. मात्र निमंत्रण पात्रिकेची छपाईच न झाल्याने त्यांच्यापर्यंत पात्रिका पोहवण्याचेही आव्हान आयोजकांपुढे आहे. (प्रतिनिधी)>माहितीचा महामार्गसंमेलनाबाबत स्वागताध्यक्ष गुलाब वझे आणि आयोजक आगरी युथ फोरमकडून अधूनमधून माहिती मिळते. मात्र महामंडळाकडून पुणे आणि नागपूरचे प्रतिनिधी माहिती देतात. त्यामुळे संमेलनाच्या माहितीचे अनेक महामार्ग तयार झाल्याचे दिसून येते. आधीच नोटाबंदी आणि कोकण शिक्षक मतदारसंघाच्या आचारसंहितेमुळे आयोजक मेटाकुटीला आलेले असताना त्यात परस्परविरोधी माहितीमुळे भर पडते आहे.