शहरं
Join us  
Trending Stories
1
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
2
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
3
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
4
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
5
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
6
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
7
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
8
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
9
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
10
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
11
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
12
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
13
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
14
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
15
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
16
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
17
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
18
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
19
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
20
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!

पुन्हा ५० नेते फुटीच्या उंबरठ्यावर; भाजपची वाटचाल 'राष्ट्रवादी जनता पार्टी'कडे ?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2019 5:55 PM

२०१९ विधानसभेसाठी भाजपने राष्ट्रवादी पक्षच रिकामा करण्याचा धडाका सुरू केला. ज्या नेत्यांवर भ्रष्टाचारांचे आरोप केले, त्यांनाही पक्षात घेण्याचं काम भाजपकडून करण्यात येत आहे.

मुंबई - काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर भ्रष्टाचाराचे भरमसाठ आरोप करून सत्तेवर आलेल्या भारतीय जनता पक्षाने आगामी विधानसभा निवडणुकीची चांगलीच तयारी केली आहे. लोकसभा निवडणुकीत मिळावलेल्या विजयानंतर सर्वात मजबूत ठरलेल्या भाजपला पुन्हा सत्ता मिळविण्याचा विश्वास आहे. परंतु, सध्या भाजपकडून राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांना देण्यात येत असलेला प्रवेश पाहून भाजपच स्वरुप राष्ट्रवादी जनता पार्टी असं होतय का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

२०१४ मध्ये सत्तेवर येण्यापूर्वी भाजपकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते. विविध घोटाळ्यांच्या आरोपांनी २०१४ ची निवडणूक गाजली होती. सत्ता आल्यानंतर राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांना तुरुंगात जाव लागणार असा इशारा, त्यावेळी भाजपकडून देण्यात आला. मात्र तस काहीही झालं नाही. याउलट २०१९ विधानसभेसाठी भाजपने राष्ट्रवादी पक्षच रिकामा करण्याचा धडाका सुरू केला. ज्या नेत्यांवर भ्रष्टाचारांचे आरोप केले, त्यांनाही पक्षात घेण्याचं काम भाजपकडून करण्यात येत आहे.

आतापर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील ३० नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून यामध्ये महिला नेत्यांचा देखील समावेश आहे. तसेच दुसऱ्या टप्प्यात आणखी ५० आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये अनेक विद्यमान आमदारांचा समावेश असल्याचे समजते. भाजपमध्ये ही इनकमिंग अशीच सुरू राहिल्यास, येणाऱ्या काळात भाजप नेतृत्वाला देखील पक्षांतर करून आलेले आणि पक्षातील नेते यांचा हिशोब ठेवण्यासाठी खास माणसं नियुक्त करावी लागतील.

स्वबळावर लढण्याची पूर्वतयारी

भाजपकडून विरोधी पक्षातील नेत्यांना पक्षात घेण्याची कारण आता स्पष्ट होत आहेत. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेसोबत युती करून भाजप निवडणुकीला सामोरे गेले. त्याचवेळी विधानसभेला देखील युती राहणार हे निश्चित करण्यात आले होते. परंतु, राज्यात वाढलेली ताकत पाहता भाजपचा इरादा स्वबळावर लढण्याचा दिसून येतो. अशा स्थितीत स्वबळावर लढायचे म्हटल्यानंतर विरोधी पक्षातील नेत्यांना पक्षात घेणे फायदेशीरच ठरणार आहे. त्यामुळे भाजपची ही स्वबळावर लढण्याची पूर्वतयारी असण्याची दाट शक्यता आहे.