शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
3
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
4
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
5
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
6
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
7
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
8
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
9
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
10
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
11
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
12
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
13
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
14
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
15
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
16
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
17
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
18
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
19
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
20
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

रक्ताने चिठ्ठी लिहील्यानंतर युवकाची रेल्वेखाली उडी मारुन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2016 19:17 IST

उमरी येथील एका युवकाने स्वत:च्या रक्ताने चिठ्ठी लिहून नंतर रेल्वेखाली उडी घेउन आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी घडली.

 ऑनलाइन लोकमत 

अकोला, दि. १ -  उमरी येथील एका युवकाने स्वत:च्या रक्ताने चिठ्ठी लिहून नंतर रेल्वेखाली उडी घेउन आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी घडली. या प्रकरणी सिव्हील लाईन्स पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या युवकाच्या खिशातून रक्ताने लिहीलेली चिठ्ठी आणि ब्लेडचे धारदार पान जप्त केले आहे.
उमरी येथील रहिवासी सागर बाहकार या युवकाने शुक्रवारी दुपारी उमरी परिसरातच रेल्वेखाली उडी घेउन आत्महत्या केली. तत्पुर्वी सागरने रक्ताने एक चिठ्ठी लीहिली .यामध्ये त्याने रियली सॉरी म्हटले आहे. एका मुलीचे व एका मुलाचा या चिठ्ठीत उल्लेख करण्यात आला. या तिघांचीही माफी मागून सागरने रेल्वेखाली उडी घेतली. 
पोलिसांना  सदर चिठ्ठी सागरच्या खिशात आढळली. सागरने स्वत:च्या रक्ताने ही चिठ्ठी लिहीली. त्याच्या जवळ रक्ताने माखलेले ब्लेडही पोलिसांना आढळले. पोलिसांनी ते जप्त केले आहे. सिव्हील लाईन्स पोलिसांनी या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून सागरचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.सागरच्या आत्महत्येला प्रेम प्रकरणाची किनार असल्याचा पोलिसांचा कयास आहे.
 
चिठ्ठीमध्ये असा उल्लेख
पोलिसांनी घटनास्थळावरून सागरच्या खिशातून जप्त केलेल्या चिठ्ठीत सागर, आणि एका मुलीचे नाव लिहील्यानंतर रियली सॉरी, असा उल्लेख आहे. सागरने हे वाक्य रक्ताने लिहीले असल्याचे स्पष्ट झाले आहे. शरीराच्या ज्या भागावर रक्ताने कापून हे लिहीले त्या भागाची पाहणी पोलिसांनी केली.
 
प्रेम प्रकरणाची किनार
सागर बाहकार याने प्रेम प्रकरणातून आत्महत्या केल्याची माहिती पोलिस सुत्रांकडून प्राप्त झाली आहे. सागरच्या खीशात आढळलेल्या चिठ्ठीवरुन हे प्रकरण प्रेमातुनच झाल्याचे स्पष्ट झाले.